Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Valentines Day Gift: या व्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रियकराला हे खास गिफ्ट द्या

webdunia
, बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (23:07 IST)
लोक व्हॅलेंटाइन डे वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात, परंतु प्रत्येकामध्ये एक गोष्ट समान असते, ती म्हणजे आपल्या जोडीदाराला खास भेट देण्याची इच्छा. विशेषत: मुलींना व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आपल्या प्रियकराला सर्वोत्तम गिफ्ट द्यायचे असते. पण त्यांना काय द्यावे हा मोठा प्रश्न असतो.  तर या व्हॅलेंटाईन डे ला आपण आपल्या प्रियकराला हे खास गिफ्ट देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करा. आपण दिलेले हे गिफ्ट त्यांना दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतील. 
 
1 ट्रॅक सूट - आपण आपल्या बॉयफ्रेंडला ट्रॅकसूट देखील गिफ्ट म्हणून देऊ शकता. हे खूप उपयुक्त आहे. व्यायामापासून प्रवासापर्यंत मुलांना आरामदायक कपडे घालायला आवडतं. आपण ट्रॅक सूट गिफ्ट म्हणून देऊ शकता. ट्रॅकसूट ची निवड करताना प्रियकराचा आवडीचा रंग आणि कम्फर्ट लक्षात ठेवा.
 
2 पॉवर बँक - मुलं बहुतेक घराबाहेर राहतात. मग ते नोकरी निमित्त असो किंवा अभ्यासासाठी असो. अशा परिस्थितीत आपण आपल्या बॉयफ्रेंडला पॉवरबँक गिफ्ट करू शकता. या गिफ्टचा त्यांना पुरेपूर फायदा होईल. 
 
3 रिस्ट वॉच - मुलांना घडाळ्यांची आवड असते. आपण आपल्या प्रियकराला घड्याळ गिफ्ट म्हणून देऊ शकता. 
 
4 साईड बॅग - मुलं नेहमी निष्काळजी असतात. ते आपल्या विसरभोळा स्वभावामुळे अनेकदा वस्तू गहाण करतात. आपण त्यांना साईडबॅग गिफ्ट म्हणून देऊ शकता. जेणे करून ते त्यात आपला फोन, चार्जर, रुमाल, मास्क, व्हिजिटिंग कार्ड, सहज ठेऊ शकतील.   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यूरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी हे योगासन करा