Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बा विठ्ठला, काय वर्णू महिमा मी तुझा

vitthal
, गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (09:26 IST)
बा विठ्ठला , काय वर्णू  महिमा मी तुझा ,
माय ही तूच, अन तूच बाप माझा,
गोडवे तुझे गावे वाटे खूप मजला,
शब्द मात्र सुचे ना, कसें आळवू मी तुजला,
हात जोडून, नतमस्तक होऊन, उभा भक्त तुझा रे,
कृपा करावी तूच, घ्यावं पदराखाली रे,
संकटी सकळा देव आठवतो, हीच रे रीत,
परी तूच मायबाप, करू नको विपरीत,
घाल पोटी अपराध सारे, दे आश्रय चरणी,
घे करवून सेवा, काय मागू मी आणि?
..अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bhishma Panchak 2023: भीष्मपंचक व्रत म्हणजे काय? त्याचे महत्त्व आणि उपासनेची पद्धत जाणून घ्या