Publish Date: Mon, 15 Jul 2024 (11:41 IST)
Updated Date: Mon, 15 Jul 2024 (11:41 IST)
नाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहू || १ ||
आम्ही दैवाचे दैवाचे | दास पंढरीरायाचे || २ ||
टाळ विना घेऊनि हाती | विठ्ठल नाम गाऊ गीती || ३ ||
नामा म्हणे लाखोली सदा | सहस्त्र नामाची गोविंदा || ४ ||