Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Neti Kriya : नेती क्रियेचे 7 चमत्कारिक फायदे

neti kriya
, मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (22:24 IST)
Neti Kriya : योगामध्ये बऱ्याच क्रिया विषयी माहिती मिळते. आसन, प्राणायाम यानंतर या काही क्रिया पण करायला शिकायला हव्या. क्रिया करणं हे अवघड असत. पण ह्यांमुळे आपल्याला त्वरित फायदा होतो. योगामध्ये प्रामुख्याने 6 प्रकाराच्या क्रिया असतात. 
1 त्राटक. 
2 नेती. 
3 कपाल भाती. 
4 धौती. 
5 बस्ती. 
6 नौली. 
 
येथे आपण नेतीबद्दलची माहिती जाणून घेउ या. नेती 3 प्रकारे केली जाते. 
1 सूत नेती. 
2 जल नेती. 
3 कपाल नेती.
 
1 सूत नेती : एक जाड पण मऊ दोरा ज्याची लांबी बारा इंची असावी. जेणे करून नाकाच्या छिद्रांमध्ये आरामात शिरू शकेल. ह्याला कोमट पाण्यामध्ये भिजवून ह्याचा एक टोकाला नाकाच्या छिद्रामधून टाकून तोंडाच्या वाटेतून बाहेर काढावे. ही सर्व क्रिया हळुवार करावी. मग नाक आणि तोंडाच्या दोऱ्याला धरून हळुवार पणे 2 - 4 वेळा वर खाली करावे. अश्याच प्रकारे दुसऱ्या नाकाने देखील हीच प्रक्रिया करावी. ही प्रक्रिया एक दिवसा आड करावी. 
 
2 जल नेती : दोन्ही नाकपुड्यातून हळू हळू पाणी प्या. पेल्यापेक्षा नळी असलेलं भांडं असल्यास नाकातून पाणी पिणं सोपे होईल. नळीचे भांडे नसल्यास एका पेल्यामध्ये  पाणी भरून घ्यावे. मग वाकून त्यामध्ये नाकाला बुडवून घ्या. आता हळू हळू पाणी आतमध्ये जाऊ द्या. नाकाने पाण्याला ओढायचे नाही. असे केल्यास आपल्याला थोडा त्रास जाणवेल. एकदा घसा स्वच्छ झाल्यास आपण नाकाने सुद्धा पाणी पिऊ शकता.
 
3 कपाल नेती : तोंडाच्या वाटेतून पाणी घेऊन नाकातून बाहेर काढावे.
 
नेती क्रियेचे फायदे  -
1 दृष्टी वाढते.
2 या क्रियेच्या सराव करून नाकाचे मार्ग मोकळे होते.
3 या क्रियेमुळे कान, नाक, दात, घस्याचे कुठलेही आजार होत नाही.
4 ही क्रिया सतत केल्याने सर्दी, पडसे, खोकला होत नाही. 
5 ही क्रिया केल्याने डोकं, मन स्थिर आणि शांत होते. शरीर निरोगी राहते. 
6 नेती क्रिया ही मुख्यतः श्वसन संस्थेशी निगडित अंगांचा स्वछतेसाठी केली जाते. हे केल्याने आपणास प्राणायाम करायला सोपे जाते.
 
चेतावणी : दोऱ्याला नाकामध्ये घालण्यापूर्वी गरम पाण्यात उकळून घ्यावे. जेणे करून त्यावर कोणतेही विषाणू राहत नाही. नाक, कान, दात, तोंड किंवा डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास असल्यास नेती क्रिया कुठल्या योग्य तज्ञाच्या मार्गदर्शन खाली करायला हवी. ही क्रिया केल्यावर कपालभाती करायला हवे.
 
विशेष: या क्रिया सर्वप्रथम तज्ज्ञांच्या समक्ष आणि सल्ल्याने करणे योग्य ठरेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

For slender youth सडपातळ तरुणांसाठी