आजकाल संतुलित आहाराचा बोलबाला आहे. याचवेळी अंगावर चरबी वाढण्याची समस्याही साधारण बाब बनली आहे. आरोग्याची योग्य जाण नसल्याने ही समस्या गंभीर बनत चाललीय आणि लठ्ठपणाही वाढतोय.
लठ्ठपणामुळे आपल्याला अनेक घातक आजार होऊ शकतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी योगाचा आधार घेणे चांगले. योगशास्त्रातील एक विधी आहे कपालभाती प्राणायाम. या प्राणायामाने लठ्ठपणावर नियंत्रण मिळविणे सहजशक्य आहे. तुम्हाला अद्यापही कपालभाती कसे करावे माहित नसेल तर पुढील विधी पाहा.
चटईवर बसा. बसल्यानंतर पोट सैल सोडा. आता जोरात श्वास बाहेर सोडा आणि पोटाला हिसका देऊन आत खेचा. श्वास बाहेर सोडणे आणि पोट आत खेचणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होणे अपेक्षित आहे. सुरुवातीला ही क्रिया 10 ते 15 वेळा करा. हळू हळू 60 पर्यंत ही क्रिया वाढवू शकता. मधून मधून थोडी विश्रांती घेऊ शकता. या क्रियेमुळे फुफ्फुसाच्या खालील भागातीय हवा आणि कार्बन डाय ऑक्साईड बाहेर निघेल. विज्ञानाने सिद्ध झाले आहे की कपालभातीने शरीरावरील अनावश्यक चरबी नष्ट होते.
श्वाससंबंधी आजार असणार-यांनी कपालभाती करू नये. कपालभाती केवळ रिकाम्या पोटीच करावे. अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली कपालभाती केल्यास अधिक चांगले.