Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चेहऱ्याचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे योगासन करा

चेहऱ्याचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे योगासन करा
, बुधवार, 20 जानेवारी 2021 (18:40 IST)
चेहऱ्यावरील चरबी ही सामान्य बाब आहे. ही चरबी पुरुष आणि स्त्रियांच्या चेहऱ्यावर असू शकते. बहुतेक लोकांच्या हनुवटीवर भरपूर चरबी असते जी हळू-हळू वाढते आणि लठ्ठपणाचा रूप घेते ज्यामुळे असं वाटते की दोन हनुवटी झाल्या आहे.ह्याला सामान्य भाषेत डबल चिन म्हणतात. बऱ्याच बायकांना असं वाटते की डबल चिन मुळे त्यांचा चेहरा सुंदर दिसत नाही. तर असं काहीच नाही. डबल चिन असणारे देखील सुंदर दिसतात. परंतु डबल चिन होऊ नये त्यासाठी काही सोपे आसन आहे जे करून आपण डबल चिन कमी करू शकता.
 
* उष्ट्रासन -   
हे आसन करण्यासाठी गुडघ्यावर जमिनीवर बसा आणि शरीराला मागे वळवून टाचांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. पोटाला खेचून मागे जा.चेहरा खालील दिशेने वाकवा. असं केल्यानं हनुवटीवर ताण होताना जाणवेल. दररोज अशा प्रकारे उष्ट्रासन केल्यानं लवकरच डबल चिन कमी होऊ लागेल. चेहऱ्यावरील जास्तीची चरबी देखील कमी होऊ लागेल. 
 
* सिंह मुद्रा-
सिंह मुद्राच्या नियमित सरावाने देखील डबल चिन कमी होते. हे करण्यासाठी आपली जीभ बाहेर काढून जेवढे शक्य असेल तोंड उघडा. हे आसन केल्यानं शरीराच्या सर्व स्नायूंना चांगला ताण येतो. ज्या मुळे  हनुवटीचा लठ्ठपणा लवकरच कमी होतो. दररोज किमान 2 ते 5 मिनिटे हे आसन केल्यानं चेहरा आकारा मध्ये येतो.
 
* आकाशाला चुंबन घ्या -
डबल चिन कमी करण्यासाठी हे आसन खूप प्रभावी आहे. आपण प्रयत्न करा की तोंडाला वर उचलून दृष्टी आकाशाकडे ठेवून आकाशाला चुंबन घेण्याची कृती करा. असं केल्यानं डबल चिन कमी होऊ लागेल. हे आसन कधी ही करू शकता. हे किमान एकदा 15 ते 20 वेळा करा. कामाच्या मध्ये देखील आपण थोड्या वेळ विश्रांती घेताना हे योगासन करू शकता. चेहरा बारीक होईल.
 
* मान वळवा -   
हे आसन करताना सुखासनात बसा आणि मानेला हळू-हळू गोल फिरवा. खाल पासून वर पर्यंत आणि वर पासून खाल पर्यंत मान गोल फिरवायची आहे. असं एक चक्र पूर्ण करायला अर्धा मिनिटाचा वेळ द्यावा. एका वेळी  असे 15 चक्र पूर्ण करा. खाली येताना डोक्याला पूर्णपणे वाकवा. अशा प्रकारे आपण सहजपणे डबल चिन अदृश्य करू शकाल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दातासह जीभ देखील स्वच्छ करा, अन्यथा हे त्रास होऊ शकतात