Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mentally Strong नियमित योग करून मानसिक दृष्ट्या बळकट व्हा

yoga
, शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (19:58 IST)
असे म्हणतात की शरीर बळकट तर मन आणि मेंदू देखील बळकट असतं. पण ही कल्पना चुकीची आहे. बळकट शरीराचे माणसं मानसिकतेने आजारी असतात. व्यायामशाळेत किंवा जिमखान्यात केल्या जाणाऱ्या व्यायामामुळे शरीर तर बळकट होते पण मन आणि मेंदू तसंच राहतं. योग आपल्या मन आणि मेंदूला बळकट करून आपल्याला मानसिकरीत्या सामर्थ्यवान बनवतं. कसे काय हे आपण जाणून घेऊया....
 
1 योगासनाचं अंग : लहानपणी आपले अंग लवचीक असतं. वाढत्या वयात हाडे कडक होतात. कडक हाड मोडण्याची दाट शक्यता असते. लहान बाळ पडल्यावर त्याचे हाड मोडण्याची शक्यता कमी असते. पण एखादा तरुण पडल्यावर त्याचे हाड मोडण्याची शक्यता दाट असते. योगामुळे आपली हाडं पुन्हा लवचीक बनवून दीर्घ काळापर्यंत होणाऱ्या कॅल्शियमचे क्षरण दूर करतं. 
 
योगासन केल्याने शरीर लवचीक होतं. ह्याला अतिरिक्त आहाराची गरज नसते आणि याने सर्व प्रकारांच्या आजारापासून बचावाची क्षमता असते. सतत योग करणार्‍यांनी योगा करणे बंद केले तरी शरीरात कोणत्याही प्रकारचे विपरित बदल होत नाही आणि हातपायांमध्ये देखील वेदना जाणवत नाही. जेव्हा चपळता दाखविण्याची वेळ येते तर शरीर त्वरित सक्रिय होण्याची क्षमता ठेवतं. 
 
आहार नियमांचे पालन करत सूर्य नमस्कारासह योगाचे आसन सतत करत राहिल्याने 4 महिन्यातच शरीर लवचीक आणि निरोगी होतं. आपण स्वतःला नेहमीच ताजेतवाने आणि तरुण अनुभवाल. योगासनांच्या नियमित सरावामुळे पाठीचा कणा बळकट होतो. ज्यामुळे नसा आणि रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि शरीराचे अंग सहजरीत्या कार्य करतात. हाच मेंदूला बळकट करण्याचा पहिला टप्पा आहे.
 
2 प्राणायामाचे मन : प्राणायाम केल्याने मेंदू बळकट होऊन त्याची कार्यशक्ती वाढते. यामुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते. प्राणायाम केल्याने मनात कधीही दुःख, उदास आणि राग येत नाही. मन नेहमी आनंदी राहते. ज्यामुळे आपल्या ओवतीभोवती वातावरण प्रसन्न राहतं. आपण जीवनात कुठल्याही संकटामुळे निराश होणार नाही. आपणास इच्छा असल्यास ध्यानाला आपल्या दिनक्रमाचा एक भाग बनवून आपल्या मेंदूला अजून बळकट करू शकता. 
 
याने मेंदूत कोणत्याही प्रकारचे विकार नाहीसे होतात. माणसाची विचारसरणी विस्तृत आणि परिष्कृत होते. परिष्कृत म्हणजे स्वच्छ आणि स्पष्ट. अश्या व्यक्तीची बुद्धिमत्ता तीक्ष्ण होते. आणि असे लोक विचारपूर्वक बोलतात. भावनांमध्ये न वाहता बोलतात. 
 
निरंतर योगाचा परिणाम असा आहे की हे शरीर, मन आणि मेंदू उत्साही झाल्यावर आपली विचारसरणी बदलते. विचार बदल्यामुळे आपल्या जीवनात देखील परिवर्तन येतं. योगामुळे सकारात्मक विचारसरणीचा विकास होतो. कोणत्याही प्रकाराचे मानसिक आजार असल्यास ते नाहीसे होतात. जसे काळजी होणे, अस्वस्थता, घाबरणे, नैराश्य, शोक, संशयास्पद प्रवृत्ती, नकारात्मकता, द्वैत किंवा गोंधळ इत्यादी. 
 
एक निरोगी मेंदू आनंदी जीवन आणि उज्जवल भविष्य बनवतं. योगाने जिथे आपल्या शरीराची ऊर्जा जागृत होते, तिथे आपल्या मेंदूच्या आतील भागात लपलेल्या रहस्यमयी शक्तींचा उद्गम होतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी शरीरातील सकारात्मक ऊर्जा आणि मेंदूच्या शक्तीची गरज असते. हे केवळ योगाद्वारेच मिळू शकते. इतर कोणत्याही व्यायामाने नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mava Kachori मावा कचोरी