Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वक्रासन करण्याचे फायदे जाणून घ्या

Benefits of Vakrasana
, शनिवार, 10 जानेवारी 2026 (21:30 IST)
Vakrasana benefits :निरोगी राहण्यासाठी लोक विविध प्रकारचे वर्कआउट करतात. पण काही लोकांना वर्कआउट करणे जमत नाही या साठी अशी अनेक योगासने आहेत, ज्याचा सराव करून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. वक्रासन हे या योगासनांपैकी एक आहे. हे असे एक आसन आहे, जे तुमची पाचक प्रणाली मजबूत करण्यापासून अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करते. चला तर मग वक्रासनाचे फायदे जाणून घेऊ या.
1 पचनसंस्था सुरळीत होते-
वक्रासन हे असेच एक योग आसन आहे, जे तुमच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे . जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पचनसंस्थेशी संबंधित इतर समस्या असल्यास या आसनाचा नियमित सराव करावा. पचनसंस्थेशी संबंधित समस्यांपासून लवकरच सुटका होईल.
 
2 चयापचय मजबूत होते-
वक्रासनाच्या नियमित सरावामुळे पचनक्रिया सुधारते, या आसनाचा चयापचयावरही सकारात्मक परिणाम होतो. विशेषत: वक्रासनाचा सराव सकाळी केला तर ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि चयापचय दरही सुधारतो. यामुळेच वक्रासनाचा सराव केल्याने वाढलेले वजनही हळूहळू कमी होऊ लागते.
3 शरीर लवचिक बनते-
वक्रसनाचा सराव करणे देखील फायदेशीर मानले जाते कारण ते तुमचे शरीर अधिक लवचिक बनवते. या आसनाचा सराव केल्याने तुमची कंबर वळते आणि त्यामुळे  मणका अधिक लवचिक होतो. एवढेच नाही तर या आसनाच्या सरावाने मान आणि खांदेही मजबूत होतात.
4 मानसिक तणावातून सुटका-
वक्रासनाचा सराव केवळ शारीरिक आरोग्यासाठीच चांगला मानला जात नाही तर त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. जे लोक नियमितपणे वक्रासनाचा सराव करतात त्यांना त्यांच्या तणावाला मॅनेज करणे सोपे होते आणि तणाव वाढत नाही.
 
टीप : योगासन करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rajmata Jijau Jayanti 2026 Speech in Marathi राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी