Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे 5 योगासन करा ज्यांना केल्याने ऊर्जावान वाटेल

हे 5 योगासन करा ज्यांना केल्याने ऊर्जावान वाटेल
, गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (18:42 IST)
योगासन केल्यानं शारीरिक त्रास कमी होतात, तसेच शरीर देखील सक्रिय बनून राहत. योग अशी शारीरिक प्रक्रिया आहे, जे आपल्या शरीरासह मनाला देखील फायदा मिळवून देते. योगा केल्यानं मन आणि मेंदू दोन्ही सक्रिय राहतात.
 
आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात शरीरासाठी योग करणे आवश्यक आहे.विशेषतः स्त्रियांसाठी योगा करणे खूप महत्त्वाचे आहे. घर आणि ऑफिसची जबाबदारी पेलता पेलता शरीरासह मन देखील थकू लागते अशा परिस्थितीत सकाळी उठल्यावर केले जाणारे योगासन आपल्याला संपूर्ण दिवस ताजे-तवाने आणि शारीरिक तंदुरुस्ती मिळवून देतात. चला तर मग काही अशा आसनांबद्दल जाणून घेऊ या ज्यांना केल्यानं शरीराला फायदे मिळतात. 
 
* बद्ध कोणासन-
ह्या आसनाला सामान्य भाषेत तितली आसन किंवा फुलपाखरू आसन असे ही म्हणतात. हे करण्यासाठी जमिनीवर मांडी घालून बसावे लागणार. नंतर पायाची टाचे एकत्र जोडा,गुडघे वर खाली करायचे आहे. हे आसन केल्यानं स्नायू ताणतात. या अवस्थे मध्ये बसून स्त्रियांना अंडाशय आणि किडनीशी निगडित समस्यांमध्ये आराम मिळतो. ज्यांना अपत्य होत नाही म्हणजे वंधत्व असणाऱ्या बायकांचे त्रास देखील दूर होतात. तसेच मासिक पाळीच्या वेळी  होणाऱ्या वेदनेमध्ये देखील नैसर्गिकरीत्या आराम मिळतो. 
 
* भारद्वाज ऋषी -
हे आसन केल्यानं पाठीला बळ मिळतो,मणक्याचे हाड ताठ करण्यासाठी हे एक उत्तम आसन आहे.पोटाशी निगडित सर्व त्रास भारद्वाज ऋषी आसने केल्याने दूर होतात. जर आपण दररोज सकाळी अनोश्यापोटी हे आसन करता तर आपल्याला पोटात गॅस,अपचन आणि बद्धकोष्ठता सारखे त्रास होत नाही. पोटासह हे आसन पाठीच्या दुखण्यात देखील आराम देत. हे करण्यासाठी जमिनीवर मांडी घालून बस, आता आपला एक पाय दुसऱ्या मांडीवर ठेवा. हात मागे टेकवून विश्रांती घ्या. या अवस्थे मध्ये बसा. हे आसन केल्यानं पोटाची चरबी कमी होईल.
 
* जानुशीर्षासन -
हे आसन करण्यासाठी जमिनीवर पाय सरळ करून बसायचे आहे. एक पाय दुमडून मांडी घाला, पुढे वाकून पाय धरा आणि डोकं गुडघ्याला लावा. शक्य तितक्यावेळ याच अवस्थेमध्ये बसा.हे आसन केल्यानं पोट आणि मणक्याचे हाड बळकट होतात. डोकं दुखी आणि काळजी कमी करण्यासाठी हे सर्वात उत्तम आसन आहे.
  
* वशिष्ठासन -
हे आसन दिसायला जरी सोपं असलं तरी हे करण्यासाठी संतुलन असणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीस थोडा त्रास होतो नंतर हळू-हळू शरीर संतुलन बनविण्यात शिकतं. हे आसन सकाळी अनोश्यापोटी केल्यानं बाजू,कंबर, पाठ चांगल्या प्रकारे ताणली जाते. पायांना आकार देण्यासाठी हा एक चांगला आसन आहे. स्त्रियांसाठी हे आसन केल्याचे बरेच फायदे आहे. हे आसन केल्यामुळे केसांची गळती होणं,पाठ दुखणे, तणाव आणि शरीरात अशक्तपणा जाणवणे सारखे त्रास बरे होतात.
 
* चक्रासन -
चक्रासन करण्यासाठी पाठीवर झोपा. हळू-हळू आपले शरीर उचला.शरीराला उंच करण्यासाठी हात आणि पायाचा आधार घ्यावा लागणार. शरीर उंच करण्यासाठी हात उलट करून कानाच्या  बाजूने लावा. पाय एकत्र करा. हळू-हळू उंच व्हा.हे आसन केल्याने कधीही आपली पाठ दुखणार नाही तसेच पोटाचा घेर देखील वाढणार नाही. डोक्यापासून पाया पर्यंत शरीराला ताणण्यासाठी हे एक उत्कृष्ट आसन आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी काही सोप्या टिप्स अवलंबवा