Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अध्यात्मिक चेतनेच्या विकासासाठी नियमित हे आसन करा

अध्यात्मिक चेतनेच्या विकासासाठी नियमित हे आसन करा
, बुधवार, 24 मार्च 2021 (18:20 IST)
बालासन याला शिशु आसन देखील म्हणतात. हे आसन करतानाची मुद्रा अशी असते जसे की  एक बाळ झोपतो. हे आसन केल्याने शरीरातील सर्व ताण आणि थकवा दूर होतो. हे आसन प्रामुख्याने अध्यात्मिक चेतना विकसित करण्यासाठी केले जाते. हे दिसायला आणि करायला सोपे आहे. या आसनाने अनेक फायदे मिळतात. चला तर मग हे आसन करण्याची पद्धत आणि याचे फायदे जाणून घेऊ या. 
 
बालासन कसे करावे-
सर्वप्रथम टाचांवर बसावे, कुल्हे टाचांवर ठेवा, पुढे वाका आणि कपाळ जमिनीला स्पर्श करा. हातांना डोक्याच्या पुढे नेत जमिनीवर स्पर्श करा. तळहात आकाशाकडे असावे. किंवा तळहात एकमेकांवर ठेऊन कपाळ त्यावर ठेवा. शरीराचे संपूर्ण वजन मांडीवर टाकून शरीराला आरामाच्या स्थितीत ठेवा. याच स्थितीत पाच ते 10 मिनिटे राहा.
 
* फायदे- 
* हे आसन केल्याने मेंदू शांत होतो आणि राग देखील कमी होतो. 
* शरीराच्या अंतर्गत अवयवांमध्ये लवचिकता येते. 
* कंबर,खांदे, मान,पाठ,स्नायूंमध्ये वेदनाहोणे आणि सांधे दुखी पासून आराम मिळतो. 
* मेंदूचे ताण कमी होऊन शांती मिळते.
* अध्यात्मिक चेतनेच्या विकासात फायदेशीर आहे. 
* मासिक पाळीच्या वेळी होणारी  कंबरेची आणि पोटाची वेदना कमी करण्यात फायदेशीर आहे. 
 
*टीप - खबरदारी- 
* पाठीत किंवा गुडघ्यात वेदना असेल त्यांनी हे आसन करू नये. 
* पोट दुखी किंवा अतिसार असल्यास हे आसन करू नये. 
* गरोदर स्त्रियांनी हे आसन कोणत्याही प्रशिक्षकाच्या सल्ला शिवाय करू नये. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनंत हलवायाचे दुकान पण काव्यमय !!!