योग म्हणजे नव्हे नुसती साधना,
मन अन शरीर स्वास्थ्याची ती आराधना,
नानावीध योगक्रिया, मिळवण्या शांती,
ऊर्जा खेळविते शरीरी, होते मानसिक प्रगती,
कित्येक गंभीर आजार पळून जातात,
जीवन कसें जगावं ते आपल्यास शिकवतात,
एक एक अवयवाचे व्यायाम ह्यात आहेत,
सर्वांगीण विकासाचे हे महाद्वार आहे,
वयाच बंधन याकरीता मुळी नाही,
स्त्री पुरुषांचा भेदाभेद अजिबात नाही,
दिवसाची सुरुवात योग करून करून बघा,
स्वस्थ आयुष्याची गुरुकिल्ली आहे, आजमावून बघा!
..अश्विनी थत्ते.