Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिफ्रेश योगा करा, निरोगी आणि तंदुरुस्त रहा

रिफ्रेश योगा करा, निरोगी आणि तंदुरुस्त रहा
, शनिवार, 10 जुलै 2021 (12:09 IST)
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरातूनच ऑफिस काम सुरू आहेत. घरात राहून हात पाय आखडतात. या पूर्वी धावपळीचं, धकाधकीचं आयुष्य होतं. वेळच मिळत नसे. आता घरातून काम करायचे आहे तर सगळ्यांकडे वेळेचा अभाव तर आहेत. अशामध्ये अधून-मधून आपले ऑफिसचे काम करताना स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी रिफ्रेश योगा करा. 
 
1 अंग संचलन : 
याला सूक्ष्म व्यायाम देखील म्हणतात. आपण हे बसून, उभारून किंवा झोपून देखील करू शकता. या साठी आपल्या मनगटाला, टाचांना, कंबरेला, डोळ्याच्या पापण्यांना, मानेला आणि खांद्याला क्लाकवाइज आणि मग एंटीक्लाकवाइज किमान 4 ते 5 वेळा फिरवा. डोळे, जीभ, मनगट बोटांना, कंबरेला मानेला उजवीकडे डावीकडे, वर खाली करत गोल फिरवा हाताची मूठ उघड-बंद करा. त्याच प्रमाणे पायांच्या बोटांचा देखील योगाभ्यास करा. दोन्ही खांदे हाताला कंबरेवर ठेवून क्लाकवाइज आणि मग एंटीक्लाकवाइज फिरवा.
 
2 अंगाला ताणणे : 
कानाला पिळा, पूर्ण तोंड उघडून बंद करा. आळस आल्यावर आनंद घेत आळस द्या. मांजर किंवा कुत्र्या सम अंगाला ताणणे देखील एक प्रकारचा योग आहे. ज्यामुळे स्नायूंमध्ये ताण येतो. आणि त्या पुन्हा ताजेतवानं होतात.
 
3 हाता पायांच्या व्यायाम :
उजव्या हाताने डावा आणि डाव्या हाताने उजवा खांदा धरून त्याला दाबा. आता दोन्ही हात एकमेकांचं मनगट धरून वर उचलत डोक्याच्या मागे घेऊन जा. श्वास घेत उजव्या हाताने डाव्या हाताला उजव्या बाजूच्या डोक्याच्या मागे ओढावं. मन आणि डोकं स्थिर ठेवा. श्वास सोडत हातांना वर घेऊन जा. अश्याच प्रकारे ही क्रिया दुसऱ्या बाजूने करा. 
 
4  किमान 5 मिनिटे ध्यान करा : 
वेळ असल्यास फक्त 5 मिनिटे ध्यान करा. या मुळे आपल्याला स्वतःला ताजेतवाने अनुभवाल. मानसिक द्वंद्व, काळजी, दुःख, किंवा मेंदूत होणाऱ्या विचारांचं मंथन होतं असल्यास शांत वाटेल आणि ताण दूर होईल. जर आपण जास्त ताणतणावात असाल किंवा जास्त विचारात असाल तर ध्यान करताना पोटाची आणि फुफ्फुसातील हवा बाहेर काढून द्या. आणि पुन्हा नव्याने स्वच्छ आणि ताजी हवा भरा. असे किमान 5 ते 6 वेळा करा. 
 
5 डुलकी ध्यान : 
आपण जिथे असाल तिथेच बसून किंवा उभारून स्वतःला स्थिर करून डोळे पूर्णपणे बंद करून फक्त 1 मिनिट डुलकी घ्या. कधी ही आपल्याला झोप येते असे वाटल्यास एक डुलकी आवर्जून घ्या. त्यात श्वासोच्छ्वासाचा अनुभव घ्या. दीर्घ श्वास घ्या. आठ तासाच्या झोपे पेक्षा अधिक महत्त्वाची असते ही डुलकी घेणं. जे मेंदूची सक्रियता वाढवतं. आणि माणसाला नेहमी ताजेतवाने आणि निरोगी ठेवतं. या मुळे मानसिक ताण कमी होतो आणि डोळ्यांना आराम मिळतो. या मुळे श्वास संतुलित होतो. हृदय आणि फुफ्फुसांमध्ये नवीन चेतना येते.
 
फायदा : हा व्यायाम संपूर्ण हात-पाय सर्वाइकल स्पॉंडिलाइटिस, फ्रोजन शोल्डर, सांधे दुखी, सायटिका, डोळ्याचे आजार, ताण, डोकेदुखी, मानदुखी, कंबर दुखी, पाठदुखी, पोटाचे आजार, कमकुवत हाड, अशक्तपणा, रक्त अशुद्धता, आळस, बद्धकोष्ठता इत्यादी रोगात फायदेशीर आहे.
 
रिफ्रेश योगा म्हणजे काय :
रिफ्रेश योगा 'अंग संचलन आणि प्राणायामाचा' एक भाग आहे. आपण हे केल्यास आपल्याला मानसिक शांती मिळेल तसेच आपण चांगलं आरोग्य अनुभवाल. आपण रिफ्रेश योगा घरात ऑफिसमध्ये, ट्रेन किंवा बस, प्लॅन मध्ये देखील करू शकता. हे फ्रेश आणि ताजेतवाने होण्याची एक प्रभावी पद्धत आहे. वास्तविक हे लहानलहान गोष्टींचा संक्षिप्त संग्रह आहेत. ज्याला आपण कळत-नकळत करतो, गरज आहे तर त्याला योग्य पद्धतीने करण्याची.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IGNOU ने एग्जामिनेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख वाढवली