Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शवासन : नेहमी शरीरात वेदना आणि थकवा यामुळे त्रस्त असणार्‍यांसाठी फायद्याचं

शवासन : नेहमी शरीरात वेदना आणि थकवा यामुळे त्रस्त असणार्‍यांसाठी फायद्याचं
, मंगळवार, 6 एप्रिल 2021 (09:48 IST)
वर्क फ्रॉम होम असो वा वर्क फ्रॉम ऑफिस, थकवा तर जाणवतोच. विशेष करुन डेस्क जॉबमध्ये सतत गुंतणारे लोकांच्या मानसिक व डोळ्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. 
 
यामुळे सतत थकवा जाणवत असेल किंवा शरीरात वेदना होत असेल तर शवासन करणे फायद्याचे ठरेल.
 
कसे करावे शवासन
शवासन करताना केवळ सरळ पडून राहावे. घरातील तो कोपरा शोधा जिथे शांती असेल.
एका जागेवर चटई घालून पाठीवर सरळ झोपून जा.
दोन्ही हात शरीरापासून किमान 5 इंच लांब ठेवा.
दोन्ही पायात किमान 1 फुट लांबी असावी.
तळहात आकाशाकडे ठेवा. 
शरीराला हलकं सोडा.
डोळे बंद करा.
हळुवार श्वास घ्या.
पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित ठेवा.
 
शवासनाचे फायदे
याने ताण दूर होतं.
उच्च रक्तदाब, मधुमेह, मनोविकार, हृद्यासंबंधी आजार याने दूर होतात.
याने थकवा दूर होतं व मनाला शांती मिळते.
शवासन केल्याने स्मरणशक्ती, एकाग्रता शक्ती देखील वाढते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

योगासन करताना या सावधगिरी बाळगा