Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Stay young with Halasana : हलासनामुळे सदैव रहा तरुण

Stay young with Halasana : हलासनामुळे सदैव रहा तरुण
, बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (22:18 IST)
कृती: आधी पाठिवरती झोपावे. दोन्ही पाय एकमेकांना जोडावेत. दोन्ही हातांचे पंजे जमिनीला लावून कमरेला जुळवून ठेवावेत.
 
आता श्वास हळूहळू बाहेर सोडावा. यानंतर दोन्ही पाय सावकाश वरती उचलावे. गुडघे सरळ ठेवत पाय आकाशाच्या दिशेने उंच उचलावेत. पुन्हा पायांना हळूहळू डोक्याच्या मागे नेण्याचा प्रयत्न करावा. अधिक त्रास होत असेल तर, अशा वेळी दररोजच्या सरावानंतर पाय मागे नेण्याचा प्रयत्न करावा. 
 
आपल्या कार्यशक्तीनुसारच हा व्यायाम वाढवावा. अन्यथा मानेला त्रास होण्याची शक्यता आहे. 
 
सूचना : मानेचा किंवा पाठीच्या मणक्याचा विकार असलेल्यांनी हा व्यायाम करणे टाळावे. ज्यांना गळ्याचा गंभीर आजार आहे अशा रुग्णांनीही हे आसन करणे टाळावे. 
 
फायदा: पाठीच्या मणक्याचा त्रास हा वृद्धापकाळात प्रत्येकालाच होतोच. हलासन केल्याने वृद्धापकाळात याचा फायदा होतो. तसेच याच्या नियमित अभ्यासाने अजीर्ण, गॅसेस, थायराईड, दमा, कफ, रक्तविकार आदी त्रास कमी होतात. 
  
शरीरातील महत्त्वाचा भाग म्हणजे नाड्या. तीन नाड्या आपल्या शरीरात असतात. आपण डॉक्टरकडे अथवा कोणत्याही वैद्याकडे गेलो तर, सर्वांत आधी ते आपला हात हातात घेऊन या नाड्या तपासतात. या नाड्यांवरून आपल्याला होणार्‍या त्रासाचे निदान डॉक्टर करत असतात. 
 
या नाड्यांचे काम बिघडले तरी आपण आजारी पडतो. या नाड्यांवर नियंत्रण करण्याचे काम हलासनाने शक्य होते. या आसनाने शरीर शुद्ध होतेच परंतु शरीरावर चेहर्‍यावर तेज निर्माण होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hair care : केसांसाठी महत्वाचे मुद्दे