Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पचनाशी निगडित समस्या असेल तर दररोज वज्रासन करा

पचनाशी निगडित समस्या असेल तर दररोज वज्रासन करा
, बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (10:58 IST)
आजच्या जीवन शैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे बरेच लोक पचनाशी निगडित समस्यांसह संघर्ष करतात. पण आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास, ऍसिडिटी चा आणि गॅसचा त्रास नको असल्यास दररोज वज्रासनाचा सराव करणं फायदेशीर असणार. या आसनाला केल्यानं पोटाच्या तक्रारी पासून आराम मिळतो.

चला तर मग या आसनाला करण्याची पद्धत जाणून घेऊ या. या आसनाला वज्र आसन म्हणून म्हणतात कारण ते हिरे आणि वज्राच्या आकारात बसून करतात. आपण या आसनात बसून प्राणायाम देखील करू शकता. हे आसन अन्न लवकर पचन करण्यास मदत करतं म्हणून हे आसन नेहमी जेवण केल्यावरच करण्याचा नियम आहे.
 
वज्रासन कसं करावं -
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या गुडघ्यांना मागे वळवा. आपले कुल्हे किंवा नितंब टाचे वर ठेवा. लक्षात ठेवा की आपले दोन्ही पाय एकमेकांना स्पर्श होता कामा नये. आपले डोकं, मान आणि मणके एका सरळ रेषेत ठेवा आणि तळहात आपल्या मांडीवर ठेवा. काही काळ याच स्थितीत बसून राहा.
 
वज्रासनाचे फायदे - 
* वज्रासन केल्यानं आपल्या पोटाच्या खालच्या भागात रक्त परिसंचरण वाढते, जे पचन सुधारते.
 
* जेवण केल्यावर वज्रासनात बसल्यानं अन्न चांगले पचते.
 
* वज्रासन केल्यानं वेदनेत आराम मिळतो तसेच पाय आणि मांडीच्या नसा बळकट होतात.
 
* हे आसन केल्यानं संधिवात आणि संधिरोग होण्याची शक्यता कमी होते.
 
* वज्रासन केल्यानं पाठीचा कणा बळकट राहतो.
 
विशेष: ज्या लोकांना गुडघ्यात काही त्रास आहेत त्यांनी हे आसन करू नये. जर आपल्याला मणक्याचे किंवा पाठीच्या कण्याचे काही आजार असल्यास हे आसन करू नये. एखाद्या गरोदर बाईला हे आसन करावयाचे असल्यास त्यांनी आपल्या गुडघ्यामध्ये अंतर ठेवून बसावं, जेणे करून पोटावर दाब येत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिवाळ्यात आपल्या बाळाला न्यूमोनिया पासून कसे वाचवायचे जाणून घ्या