Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Yoga Asanas For Sagging Breast : स्तनांना आकार देण्यासाठी या योगासनांचा सराव करावा

Yoga Asanas For Sagging Breast :  स्तनांना आकार देण्यासाठी या योगासनांचा सराव करावा
, शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (22:41 IST)
प्रत्येक स्त्रीला सुंदर आणि सुडौल शरीर हवे असते. मात्र, आजच्या अस्वस्थ जीवनशैलीमुळे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे महिलांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर त्यांच्या शरीराचा आकारही बिघडू लागतो. अनेक स्त्रिया वजन वाढणे, लठ्ठपणा किंवा स्तनांचा आकार खराब झाल्याची तक्रार करतात.

अनेक वेळा स्त्रिया स्तनाचाआकार वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी औषधे आणि रसायनयुक्त उत्पादने वापरण्यास सुरुवात करतात,जे हानिकारक असू शकतात. स्तनांच्या खराब आकाराच्या समस्येने त्रस्त असाल तर काही योगासनांचा सराव करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.चला जाणून घेऊ या.
 
1 पर्वतासन-
या आसनाला पर्वतीय मुद्रा म्हणतात. पर्वतासनाच्या सरावाने स्तनाभोवती रक्ताभिसरण वाढते. यामुळे स्तनांचा व्यायाम होऊन आकार योग्य होतो. पर्वतासनाचा सराव करण्यासाठी प्रथम पद्मासनात बसावे. आता दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफून दीर्घ श्वास घ्या आणि हात वरच्या दिशेने ओढून घ्या. वरीलप्रमाणे शरीर आणि हात वरील दिशेला ताणताना श्वास रोखून धरा. आता हळूहळू श्वास सोडा आणि जुन्या स्थितीत परत या. हे आसन चार ते पाच वेळा करा.
 
2 भुजंगासन-
या आसलाला कोब्रा पोझ म्हणतात , जे करताना शरीराचा आकार सापासारखा दिसतो. या आसनाच्या सरावाने स्तनांचा आकार वाढू शकतो.भुजंगासन केल्याने स्तनांच्या सभोवतालचे स्नायू ताणले जातात आणि स्तन आकारात दिसतात. भुजंगासनाचा सराव करण्यासाठी चटईवरती  पोटावर  झोपा. आता दोन्ही पाय एकत्र जोडून तळवे जमिनीवर ठेवा आणि शरीराचा वरचा भाग उचला. पाठीचा कणा वाकवताना दोन्ही तळहातांवर जोर द्या. या पोझमध्ये पाच ते 10 सेकंद रहा. नंतर हळूहळू श्वास सोडा आणि जुन्या स्थितीत परत या.
 
3 शलभासन-
शलभासनला लोकस्ट पोझ असेही म्हणतात. शलभासनामुळे स्तनांभोवतीचे स्नायू ताणले जातात आणि रक्ताभिसरण वाढते. यामुळे स्तनाचा आकार वाढतो. शलभासनाच्या सरावासाठी पोटावर झोपताना दोन्ही तळवे नितंबांवर ठेवा. आता श्वास घेताना डावा पाय वरच्या दिशेने वर करा. या दरम्यान उजवा पाय सरळ ठेवा. हळूहळू श्वास सोडत, डावा पायही खाली आणा. उजव्या पायाने ही प्रक्रिया पुन्हा करा. आता श्वास घेताना दोन्ही पाय आणि शरीराचा वरचा भाग शक्य तितका वर घ्या. आता श्वास सोडताना पाय खाली हलवा. 
 
टीप -योग तज्ञांच्या सल्ल्यानुसार योगासनांचा सराव करा 

Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career in B.Tech in Civil Engineering : बीटेक इन सिव्हिल इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, शीर्ष महाविद्यालय, व्याप्ती ,पगार जाणून घ्या