शरीरातील चरबीचे वाढलेले प्रमाण लूकच खराब करत नाही तर आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतात. पण प्रश्न असा आहे की वाढलेली चरबी कमी करणे इतके सोपे आहे का? खरं तर साधारणपणे शरीरातील वाढलेली चरबी कमी करणे हे मोठे आव्हान असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते चरबी जाळण्यासाठी आहार आणि शारीरिक हालचाली यांचा मेल असणे आवश्यक आहे. जर तुम्ही देखील शरीरातील वाढलेल्या चरबीच्या समस्येने त्रस्त असाल तर योगाने फायदा मिळवू शकता.
आज आम्ही येथे तीन योगासनांबद्दल सांगत आहोत ज्याने चरबी जाळण्यात मदत होईल-
चेअर पोज
वजन कमी करण्यासाठी चेअर पोज किंवा उत्कटासनाचा सराव करणे फायदेशीर ठरू शकते. हे विशिष्ट आसन केवळ तुमच्या मुख्य भागाला लक्ष्य करत नसून खालच्या आणि वरच्या पाठीसाठी देखील फायदेशीर असल्याचे सांगितले गेले आहे. याने ओटीपोटाचे स्नायू सक्रिय होण्यास मदत होईल तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी देखील हे आसन उपयुक्त आहे.
वीरभद्रासन योग
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी वीरभद्रासन योगाचा सराव करणे फायदेशीर ठरू शकतो. या आसानामुळे पाय आणि हातांना टोन करता येतं. तसेच शरीराचे संतुलन सुधारण्यासाठी हे आसन उपयोगी पडतं. वाढत्या चरबीमुळे त्रस्त लोकांनी या योगासनांचा सराव करावा. हे सर्वात प्रभावी योगासनांपैकी एक मानले गेले असून पोटाची चरबी कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
धनुरासन योग
धनुरासन योग किंवा बो-पोजचा सराव पोटावरील चरबी कमी करण्यासाठी केला जातो. तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी देखील हा योगा फायदेशीर मानले जाते. हे आसन तुमचे पोट टोन करण्याचे काम करते. तसेच पाठ, मांड्या, हात आणि छाती स्ट्रेच करण्यासोबतच शरीराची मुद्रा सुधारण्यासाठी देखील हा योगा पोझ फायदेशीर मानला आहे.
टीप: आसनाची योग्य स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तज्ञांशी संपर्क साधू शकता.