Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
webdunia

श्री. अमेय पद्माकर कस्तुरे

, मंगळवार, 23 जून 2020 (14:51 IST)
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे. साधारण अडीच किलोमीटर लांबीच्या रेल्वे आणि रस्त्याचा हा सेतू म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनीअरिंग) क्षेत्रातले एक अप्रतिम उदाहरणच आहे. चला तर ह्या प्रवास वर्णनी लेखातून आपण रामेश्वरम ची सैर करूया.  
 
भगवंत कृपेने रामेश्वरमला मला तीन वेळा जाण्याची संधी मिळाली. २००२ मध्ये मी इंदूरहून माझ्या कुटुंबीयांसोबत रामेश्वरम् ला पहिल्यांदा गेलो होतो. त्यानंतर मी एक वर्ष चेन्नई येथे कार्यरत होतो तेव्हा माझ्या आई आणि पत्नी सोबत २०११ मध्ये दर्शनास गेलो होतो आणि त्यानंतर पुन्हा २०१८ साली कुटुंबातील माझ्या मावशी, मामी, बहीण व माझे स्वतःच्या कुटुंबीय असे आम्ही साधारण आठ जण पुन्हा दर्शनास गेलो होतो.
 
रामेश्वरम् हे शहर बंगालच्या उपसागरावरच वसलेले शहर असल्यामुळे नेहमी दमट असते उन्हाळ्यात तापमान थोडेसे वाढते त्यामुळे उन्हाळा सीझन फिरायच्या दृष्टीने चांगला नाहीये. उन्हाळ्यात गेलात तर सुती कपडे, इलेक्ट्रॉल, पाणी असे उपयोगी वस्तू देखील सोबत ठेवावेत. रामेश्वरम् चा इतिहास सर्वज्ञात असल्यामुळे मी या लेखात इतिहासाबद्दल उल्लेख केलेला नाहीये.  
 
रामेश्वरम् ला जाण्याकरिता बरेच पर्याय आहेत त्यातील पहिला म्हणजे ट्रेन, दुसरी आहे बस, तिसरी विमान सेवा. रामेश्वरम् येथून जवळ असणारे विमानतळ म्हणजे मदुराई विमानतळ. मदुराई करिता बऱ्याच शहरांमधून विमानसेवा आहेत. मदुराई ते रामेश्वर अंतर साधारण 180 ते 200 किलोमीटर आहे. बरेचदा मदुराई येथे जाऊन मीनाक्षी देवीच्या मंदिरात दर्शन करून आणि खादीसाठी प्रसिद्ध असलेल्या मदुराई मार्केटमधून खरेदी करून लोक रामेश्वरम् ला जातात. मदुराई विमानतळाहून प्रायव्हेट कँब ने रामेश्वरम् ला जाता येते. मदुराई हून कँबने नसेल जायचं तर एअरपोर्टवरून बस स्टैंड वर जाता येते आणि ह्या स्टॅंडवर साधारण एक तासाच्या अंतराने रामेश्वरम करता स्टेट ट्रान्स्पोर्ट बसेस उपलब्ध आहेत. मी स्वतः नॉन एसी चे तिकीट घेतले होते. त्यामुळे मदुराई ते रामेश्वर यांच्यादरम्यान होणाऱ्या तीन ते चार तासाच्या प्रवासात बरेच से निसर्गरम्य गोष्टी पाहता आल्या. स्टेट ट्रान्स्पोर्ट च्या बसेस फार छान आहेत, त्यामुळे स्वच्छ हवा अनुभवता येते. इंदूर हून रामेश्वरम् ला जायचे असल्यास इंदूर ते चेन्नई आता सरळ विमानसेवा सुरू झाली आहे. चेन्नईला विमानतळ हे तिरूसुलम रेल्वे स्टेशनला लागून आहे त्यामुळे विमानतळावरून तिरूसुलम स्टेशनहून चेन्नई एग्मोर करता लोकल ट्रेन ने जाता येते. चेन्नई एग्मोर या स्टेशनहून सायंकाळी सुटणारी चेन्नई रामेश्वरम सेतू एक्सप्रेस ने रामेश्वरमला जाता येते. ट्रेन ने हे अंतर साधारण 12 ते 14 तास पूर्ण करता येते त्यामुळे आरक्षण करून इंदूरहून निघाल्यावर अगदी दुसऱ्याच दिवशी आपण रामेश्वरमला पोहोचू शकतो.
 
रामेश्वरम येथे राहण्यासाठी बरेचसे गेस्ट हाउस उपलब्ध आहेत सर्व दुरून पर्यटक / भक्त येत असल्यामुळे जेवणाची देखील येथे उत्तम सोय आहे. मी  २०११ साली गोस्वामी मठ येथे राहिलो होतो. हा मठ मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या एकदम जवळ आहे. रामेश्वराच्या मंदिरात दर्शन करायला जाण्याआधी समुद्रस्नान करण्याची प्रथा आहे. समुद्र स्नान करण्यासाठी मंदिराजवळच एक घाट बनवलेला आहे जेथे आपण स्नान करू शकतो.  
 
समुद्र स्नान झाल्यानंतर कुंडांचे स्नान करण्याची एक प्रथा आहे कुंडांचे स्नान करण्याकरिता आपण जवळच कूपन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे अथवा एक स्वतंत्र व्यक्ती घेऊन आपल्या कुटुंबीयांसोबत आपण स्नान करू शकता. मी तिन्ही वेळेस स्वतंत्र व्यक्ती घेऊन स्नान केले होते. स्वतंत्र व्यक्ती घेतल्यास हा व्यक्ती त्याच्या जवळील असणाऱ्या छोट्या बाल्दीतून सर्व कुंडातले पाणी काढतो आणि आपल्याला अंघोळ घालतो. २२ कुंडांचे स्नान करणं आणि त्यांच्या पाण्याची चव घेणे हा एक विलक्षण अनुभव आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे स्नान केल्यानंतर गोड्या पाण्याचे स्नान करण्याने देव आपल्याला एक प्रकारे जाणीव करून देतो की खाऱ्या वाटणाऱ्या गोष्टी आयुष्यात आल्या तरी ती दैवी शक्तीच आहे जी आपणांस पुन्हा आयुष्यातील गोड वाटणाऱ्या गोष्टी देऊन जाते.  
 
२२ कुंडांचे स्नान करणं आणि त्यांच्या पाण्याची चव घेणे हा एक विलक्षण अनुभव आहे. ओल्या अंगाने रामेश्वरम च्या श्री रामनाथ स्वामींचे दर्शन करण्याची प्रथा आहे. तेलाच्या मिण मिणत्या दिव्यांच्या प्रकाशात शंकराच्या पिंडीचे दर्शन घेणे हे विलक्षण आनंद देणारी गोष्ट आहे. या मंदिरात असणारे कोरीव खांब हे देखील मंदिराचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. दर्शन करून आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो. थोड्या वेळ आराम करून बाहेर फेरफटका मारण्यास निघालो. बाहेर बरेचसे रिक्षावाले हे स्वतः रामेश्वरम् भ्रमण करवितात. त्यांच्याशी योग्य तो दर ठरवून आम्ही निघालो रामेश्वरम भ्रमणास.....
 
रामेश्वरम् ला फिरण्यासारख्या जागा
रामेश्वरमला पाहण्यासारख्या गोष्टी म्हणजे मुख्यतः रामनाथस्वामी मंदिर (रामेश्वरम् च्या ज्योतिर्लिंगास रामनाथस्वामी असे म्हणतात), धनुष्कोडी, धनुष्कोडी च्या रस्त्यावर असणारे भारतातील एकमेव असे विभीषणाचे मंदिर, तरंगणारा दगड, राम झरोखा मंदिर, श्री अब्दुल कलाम यांचे घर आणि शहराच्या एंट्रन्स मध्ये असणारे श्री अब्दुल कलामांचे म्युझियम.
 
धनुष्यकोडी हे ती जागा आहे जेथे प्रभू रामचंद्रांना लंकेत जाण्याकरिता वानर सेनेने सागरी सेतू बांधला होता. १९६४ सालापर्यंत येथे रेल्वे सुविधा देखील उपलब्ध होती, परंतु १९६४ झाली आलेल्या चक्रीवादळात, पूर्ण रेल्वेही मोडकळली. त्यानंतर येथे जाण्यास बस किंवा स्वतंत्र वाहन हाच पर्याय आहे. धनुष्यकोडी येथील जमीन ही रेताळ असल्यामुळे येथे जाण्याकरिता फोर व्हील ड्राइव्ह वेहिकल लागते त्यामुळे शहरातील रिक्षावाले धनुष्कोडीला घेऊन जात नाहीत आणि त्यांनी दाखवलेल्या पॅकेजमध्ये देखील धनुष्यकोडी समाविष्ट नसते.  
 
रामेश्वरम येथे वास्तव्य करण्यास आणि फिरण्यास दोन दिवस-एक रात्र पुरेशी आहे. रेल्वेने प्रवास करताना पांबन पुलावरून ताशी फक्त पंधरा ते वीस किलोमीटर वेगाने जाणाऱ्या रेल्वेच्या खिडकीकडे बसल्यास समुद्रावरील प्रचंड वाहणाऱ्या वाऱ्याचा अनुभव घेता येतो. हा अनुभव अगदी रोमांचकारी असतो.  
रामेश्वरम येथून सुटणाऱ्या बऱ्याच ट्रेन आहेत त्यामुळे घरी परतीचा प्रवास देखील उत्तम होतो आणि घरी परतताना रामेश्वरम मध्ये घालवलेल्या वेळेची गोड आठवण देखील मनात साठून राहते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लॉकडाउननंतर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट