Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 11 April 2025
webdunia

अदिती आता टॅलिवूडमध्ये

aditi is now tally wood
, शुक्रवार, 27 जुलै 2018 (15:58 IST)
बॉलिवूडध्ये आपले नशीब आजावण्याचा प्रयत्न अनेक कलाकार करतात. पण त्यातील काहींच्या पदरी यश तर काहींच्या अपयश येते. दरम्यान 'दिल्ली 6' या चित्रपटातून बॉलिवूडध्ये पदार्पण करणार्‍या अदिती राव हैदरीसोबतही असेच काही झाले आहे. या अभिनेत्रीचा बॉलिवूडमधील प्रवास सुरू होण्याआधीच कोलडला आहे. या हैदराबादी अभिनेत्रीने टॅलिवूडमध्ये न जाता बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. पण प्रेक्षकांवर बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून छाप पाडण्यात अपयशी राहिलेल्या अदितीने टॅलिवूडमध्ये आता पुन्हा जाण्याचे ठरविले आहे. बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट न देऊ शकलेल्या अदितीचा 'भूमी' हा शेवटचा चित्रपट होता. तिने या चित्रपटाच्या अपयशानंतर आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत परतण्याचा निर्णय घेतला आहे. तिने नुकतेच 'सम्मोहनम्‌' या तेलुगू चित्रपटातून दाक्षिणात्य प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. साऊथमधील पदार्पणातच मिळालेल्या यशाने अदितीने आपले करिअर टॅलिवूडकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणे टॅलिवूडमध्ये यश मिळविण्यासाठी अदिती धडपड करीत आहे. तिने अनेक तेलुगू व कन्नड चित्रपट साईन केल्याची चर्चा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुरूपौर्णिमा : बिन भिंतीची उघडी शाळा