Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आलियाने का नाकारला साहो

आलियाने का नाकारला साहो
बाहुबली या चित्रपटामुळे बर्‍याच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलेला अभिनेता प्रभास सध्या आगामी साहो या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण आता शेवटच्या टप्प्यात आले असून प्रेक्षकांनाही या चित्रपटाविषयीची उत्सुकता लागली आहे. साहोच्या निमित्ताने अभिनेत्री श्रद्धा कपूर पहिल्यांदाच प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. पण या चित्रपटासाठी श्रद्धा कपूरची निवड होण्यापूर्वी इतरही काही अभिनेत्रींच्या नावांना प्राधान्य देण्यात आले होते. किंबहुना अभिनेत्री आलिया भट्टकडेही साहोचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, असे वृत प्रसिद्ध झाले होते.
 
खुद्द करण जोहरनेही आलिया आणि प्रभासच्या जोडीविषयी उत्सुकता व्यक्त केली होती. पण प्रभाससोबत काम करण्या तिने नकार दिला. तिने हा चित्रपट नाकारल्यामुळे अनेकांनाच धक्का बसला. एका बिग बजेट चित्रपटात प्रभाससोबत काम करण्याची ही संधी आलियासाठी फार महत्तवाची ठरु शकली असती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलियाकडे सध्या बर्‍याच चित्रपटांची रीघ लागली आहे. येत्या काळात ती ज्या चित्रपटांतून झळकणार आहे, त्यातही तिच्या भूमिकांना बराच वाव देण्यात आला आहे. मुख्य म्हणजे चित्रपटांच्या निवडीसाठीसुद्धा आलियाला चित्रपटसृष्टीत ओळखले जातेय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ना आशावादी ना निराशावादी