बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एका ड्रग प्रकरणामुळे तुरुंगात आहे. अद्याप आर्यनच्या जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे, त्यामुळे त्याला दि.२० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात राहावे लागेल. दरम्यान, आर्यनने नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो काहीही चुकीचे वागणार नसून गरिबांना मदत करणार आहे.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी त्यांच्या टीमसह आर्यन खानचे समुपदेशन केले . या वेळी, आर्यनने म्हटले की, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी गरीब आणि दुर्बल लोकांना मदत करेल. तसेच मी कधीही काहीही चुकीचे करणार नाही . तसेच आर्यन म्हणाला की, मी नक्कीच असे काहीतरी करेन, ज्यामुळे माझा सर्वांना अभिमान वाटेल.आर्यन खानच्या वतीने अमित देसाई आणि सतीश मानशिंदे तर एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंह यांनी युक्तिवाद सादर केला. सध्या तुरुंगात असलेल्या आर्यन खानचा नंबर N956 आहे. तुरुंगात कोणालाही नावाने नाही तर त्याच्या नंबरने बोलावले जाते, त्यामुळे आर्यन खानला त्याचा कैदी क्रमांकही मिळाला आहे. आर्यन खान तुरुंगात खूप अस्वस्थ दिसत आहे. आर्यन तुरुंगाचे जेवण आवडत नाही. परंतु, बाहेरचे अन्न आणण्याची आणि खाण्याची परवानगी नाही.