Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 20 April 2025
webdunia

रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’चा ट्रेलर रिलीज…(व्हिडिओ)

golmal 4
मुंबई , शनिवार, 23 सप्टेंबर 2017 (09:30 IST)
रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजमधील ‘गोलमाल अगेन’ या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलर आज दुपारी लॉन्च करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे याही सिनेमात रोहित शेट्टीचे एन्टरटेन्मेंट मॅजिक बघायला मिळणार आहे.
 
येत्या दिवाळीत म्हणजेच २० ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. याआधीचे गोमलाम सीरिजमधील सर्वच सिनेमे तूफान गाजले. रोहित शेट्टीच्या या सेन्सलेस कॉमेडी सिनेमांची जादू प्रेक्षकांवर नेहमीच चालली आहे. आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘गोलमाल अगेन’मध्ये अजय देवगन, तब्बू, अर्शद वासरी, परिणीती चोप्रा, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर प्रकाश राज, निल नितीन मुकेश, जॉनी लिवर, मुकेश तिवारी, संजय मिश्रा, मुरली शर्मा, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर आणि सचिन खेडेकर यांच्याही या भूमिका आहेत. पहा तर मग रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमाची ही छोटीशी झलक….

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रूप पाहता लोचनी