Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
, मंगळवार, 22 मार्च 2022 (11:43 IST)
काळवीट शिकार प्रकरणात अडकलेला चित्रपट अभिनेता सलमान खान याला राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आता काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित तीन याचिकांची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा जोधपूरऐवजी उच्च न्यायालयात होणार आहे. सोमवारी उच्च न्यायालयाने सलमानच्या याचिकेवरील सर्व प्रकरणांची सुनावणी घेतल्यानंतर याचिका स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. सलमानचे वकील हस्तीमल सारस्वत म्हणाले की, हा त्याच्यासाठी दिलासादायक निर्णय आहे. सुनावणीदरम्यान सलमानची बहीण अलविराही कोर्टात हजर होती.
 
सलमान खान सप्टेंबर 1998 मध्ये राजस्थानच्या जोधपूर मध्ये 'हम साथ साथ है ' या चित्रपटाचे चित्रीकरणाच्या वेळी सैफ अली खान, नीलम,सोनाली बेंद्रे, तब्बू यांच्यासह शिकार ला गेले असता सलमान ने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सलमान खान यांना अटक करण्यात आली. 
 
काळवीट शिकार प्रकरणात, ग्रामीण सीजेएम न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती, तर या प्रकरणात सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत सिंग यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला सलमानच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात, जिल्हा जोधपूरमध्ये आव्हान देण्यात आले. त्याचवेळी राज्य सरकारच्या वतीने सहआरोपींच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात अपील सादर करण्यात आले. राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'द काश्मीर फाइल्स'च्या निर्मात्यांनी 50 टक्के रक्कम दान करावी- करणी सेना