Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी

हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी
, मंगळवार, 2 जून 2020 (09:54 IST)
सध्या देशात आणि मुंबईत कोरोंनाचा कहर सुरू आहे. मात्र बॉलीवूड मधील वाद काही थांबतात दिसत नाहीत. असाच नवीन वाद आता समोर आला आहे.
 
छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रचंड यश मिळवल्यानंतर आता जितेंद्र यांची कन्या एकता कपूरने आपले लक्ष डिजिटल प्लॅटफॉर्मवर केंद्रित केले आहे.  यासाठी  तिने ‘अल्ट बालाजी’ नामक एक वेब सीरिज अ‍ॅप देखील सुरु केलं आहे. या अ‍ॅपला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. परंतु यावर दाखवल्या जाणाऱ्या एका सीरिजमधून भारतीय जवानांचा अपमान करण्यात आला अशी टीका हिंदुस्तानी भाऊने केली आहे. त्याने या प्रकरणावरुन मुंबई येथे एकता कपूर विरोधात पोलीस तक्रार देखील केली आहे.
 
यातील तक्रार करनारा  हिंदुस्तानी भाऊ हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याने एकताच्या ‘ट्रिपल एक्स’ या सीरिजवर आपला  संताप व्यक्त केला आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून भारतीय सैनिकांचा अपमान करण्यात आला असा आरोप त्याने केला आहे. ‘ट्रिपल एक्स’ सीरिजच्या दुसऱ्या पर्वात एका सैनिकांची स्टोरी दाखवण्यात आली आहे. यामध्ये सैनिक सिमेवर असताना त्याची पत्नी इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करताना दाखवले आहे.  या स्टोरीलाईमुळे समाजात चुकीची माहिती पसरत आहे. सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान होत आहे. असा आरोप करत हिंदुस्तानी भाऊने एकता विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्याने हिंदुस्तानी भाऊने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन या तक्रारीबाबत माहिती दिली. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्रींच्या मादक दृश्यांमुळे ‘ट्रिपल एक्स’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जय हो कोविड मैय्या की!