यूपी मध्ये उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी ताकद लावली आहे. अशात बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतने यूपीच्या लोकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करताना म्हटले की आम्हाला आमच्या आवडत्या योगी सरकारला परत आणायचे आहे.
कंगना या व्हिडिओमध्ये म्हणते की, आपल्या सर्वांना माहित आहे की यूपी मध्ये निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीत कुरुक्षेत्रात आमचे एकमेव हत्यार मतदान आहे. आम्हाला आमच्या आवडत्या योगी सरकारला परत आणायचे आहे हे लक्षात ठेवा. भरपूर मतदान करा.
कंगनाने म्हटले की जेव्हाही मतदानासाठी जाल तेव्हा तीन ते चार जणांना सोबत घेेऊन जा . लक्षात ठेवा विजयाचा हा विक्रम मोडता कामा नये, एकही मत चुकता कामा नये, जय श्री राम.
हा व्हिडिओ शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "विजय का ये किर्तीमान टूटे ना, एक भी वोट छूटे ना, जय श्री राम." कंगनाच्या या व्हिडिओला अनेकजण पसंती देत आहेत.