Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

कतरिनाने माल्टामधील एक नवा फोटो केला शेअर

katrina kaif in bharat
, मंगळवार, 21 ऑगस्ट 2018 (15:59 IST)
‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच विनोदवीर सुनील ग्रोवर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. काही दिवसापूर्वी सुनीलने माल्टामधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता अभिनेत्री कतरिना कैफने माल्टामधील एक नवा फोटो शेअर केला आहे.
 
कतरिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती नव्या रुपात दिसत असून कदाचित चित्रपटामध्ये ती याच लूकमध्ये दिसून येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कतरिनाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून तिची केशभूषाही बदलल्याचं दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत तिने माल्टामध्ये चित्रीकरण सुरु झाल्याचं नमूद केलं आहे.
 
दरम्यान, अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’मध्ये सलमान खान, कतरिना कैफ, दिशा पटानी , सुनील ग्रोवर या सारखे कलाकार झळकणार असून हा चित्रपट २०१९ मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हाय हिल्स घालून करायला गेली एक; घडलं भलतंच