Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मलायकाने आपल्या नावातून खान नावाला दिला डच्चू

मलायकाने आपल्या नावातून खान नावाला दिला डच्चू
, सोमवार, 3 डिसेंबर 2018 (09:10 IST)
नेहमीच चर्चेत राहायला अभिनेत्री मलायका अरोराला आवडते. ती अरबाज खानपासून 2016 मध्ये विभक्त झाली होती. तिचा मे 2017 मध्ये घटस्फोट  झाला. ती सध्या अर्जुन कपूरसोबत डेटिंग करीत असल्याची चर्चा आहे. ती सोशल मीडियावर मलायका खान अरोरा या नावाने सक्रिय असायची. दरम्यान आपल्या आडनावातून तिने 'खान' या नावाला डच्चू दिला आहे. आपल्या इन्स्टाग्रामवरील प्रोफाईलमध्ये मलायकाने फक्त मलायका अरोरा असे लिहिले आहे. सध्या अर्जुनकपूरसोबतच्या तिच्या संबंधाची चर्चा जोरात सुरू असते. एम टीव्ही व्हीजे म्हणून मलायकाने आपल्या करिअरची सुरुवात केली. बल्लू सग्गूच्या 'गुड नालो इश्क मीठा' या रिमिक्स गाण्यातून तिने सर्वांचे लक्ष वेधले. 1998 मध्ये आलेल्या 'दिल से' चित्रपटातील 'छैंया छैंया' या गाण्याने तिचे नशीबच बदलले. त्यानंतर 2010 मध्ये आलेल्या 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यामुळे तिची लोकप्रियता वाढली. छैंया-छैंया (दिल से), मुन्नी बदनाम हुई (दबंग), पांडे जी (दबंग 2), फॅशन खत्म मुझ पर (डॉली की डोली) ही तिचे लोकप्रिय आयटम  नंबर्स आहेत.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अरशद वारसी बनणार फ्रॉड सैया