Publish Date: Fri, 22 Mar 2019 (11:21 IST)
Updated Date: Fri, 22 Mar 2019 (11:22 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील 'पीएम नरेंद्र मोदी' या बायोपिकला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाने तीव्र विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य-कला-सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पुण्यात हा इशारा दिला.
हा बायोपिक म्हणजे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग या चित्रपटाने होत असल्याची तक्रार आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत. तसेच हा चित्रपट प्रदर्शित करू नये, असा इशाराही चित्रपट गृहांना देत आहोत. तरीही हाचित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाल्यास होणार्या उद्रेकाची जबाबदारी निर्माते, वितरक, प्रशासन आणि चित्रपटगृह मालकांची राहील, असे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रदर्शित होत असून त्याचा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे.