Publish Date: Thu, 18 Oct 2018 (00:51 IST)
Updated Date: Wed, 17 Oct 2018 (15:54 IST)
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की झाली आहे. पुढील महिन्यात ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात प्रियांका आणि निकचा विवाहसोहळा पार पडणार आहे. पारंपरिक भारतीय पद्धतीनं हा विवाहसोहळा पार पडणार असून निकचा मित्रपरिवार या लग्नाला उपस्थित राहणार आहे. यासाठी प्रियांकाची पसंती राजस्थानमधल्या जोधपुर या शहराला असणार आहे. जोधपुर किंवा राजस्थानमधल्या आलिशान राजमहालात हे दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे.