Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 April 2025
webdunia

सलमानच्या ड्रिम प्रोजेक्टमधून कतरिनाची एक्झिट !

salam dreem project
अभिनेत्री कतरिना कैफची छोटीशी भूमिका बॉलिवूडचा दबंग अर्थातच सलमान खानच्या 'भारत' चित्रपटात असल्याचे म्हटले जात होते. पण कतरिनाला या भूमिकेत अजिबात रस नव्हता. याबद्दल चित्रपट दिग्दर्शक अली जफरसोबत कतरिनाची खास बातचित झाली. आता या व्यक्तिरेखेपासून कतरिनाची सुटका झाली असल्याचे सांगितले जाते आहे. यासंदर्भात बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार, कतरिनाचे चित्रपटातील पात्र काही खास महत्त्वाचे नव्हते. तरी प्रेक्षकांवर या भूमिकेचा  खास प्रभाव पडणार नव्हता आणि चित्रपटाची कथा तिच्या भूमिकेशिवायही पुढे सरकणार असल्यामुळे  'भारत'च्या निर्मात्यांनी कॅटची भूमिका वगळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकाचवेळी दोन चित्रपटांच्या तयारीत