Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

सलमानच्या 'भारत'चा टीझर रिलीज

salman khan in bharat
, गुरूवार, 16 ऑगस्ट 2018 (15:44 IST)
सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सलमान खानच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे. या टीझरमध्ये सलमान खानने कोणताही चित्रपटाचा भाग दाखवलेला नसून फक्‍त आवाज ऐकू येतो. यात सलमान टीझरमध्‍ये म्‍हणतो की, 'काही नाती जमीनीशी असतात. आणि काही रक्‍ताची. माझ्‍याकडे दोन्‍ही आहेत'. असे म्हणतो. 
 
भारतमध्‍ये सलमानसोबत कॅटरीना कैफ मुख्‍य भूमिकेत आहे. तसेच दिशा पटानी, तब्बू, नोरा फतेही आणि सुनील ग्रोवर देखील प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहेत. हा चित्रपट अली अब्बास जफर दिग्‍दर्शित करत आहेत. हा चित्रपट २०१४ मध्‍ये आलेला कोरियन चित्रपट ऑड टू माय फादरचा हिंदी रीमेक आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आणि दुःख confuse होतं....