Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तैमूरला झाली ग्लॅमरची सवय

तैमूरला झाली ग्लॅमरची सवय
, शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (20:57 IST)
तैमूर अली खान कायम चर्चेत असतो. अत्यंत गोंडस अशा तैमूरने स्वतःचा चाहतावर्ग तयार केला आहे. तैमूर कायमच कॅमेरामॅनच्या रडारवर असतो. तैमूर दिसला की सगळेजण त्याला हाक मारू लागतात. मग तोही गोड हसतो किंवा 'बाय' म्हणतो. या ग्लॅमरची तैमूरला आता सवय होऊ लागली आहे. सुरूवातीला तैमूरला काही कळत नव्हतं. पण आता त्याला समज येऊ लागली आहे. कॅमेरामननी 'तैमूर' अशी हाक मारली की तोही त्यांना प्रतिसाद देऊ लागला आहे. 
 
तैमूरचे असे व्हिडिओ आणि फोटो अपलोड होत असतात. वडिल सैफ अली खान तैमूरच्या जडणघडणीबद्दल सांगतात. सैफ म्हणतो, तैमूरला ग्लॅमरची सवय होऊ लागली आहे. हे सगळं त्याला आवडू लागलं आहे. पण तैमूरच्या आयुष्यात संतुलन असणं गरजेचं आहे. 
webdunia
लहान वयात तैमूर अशा ग्लॅमरच्या आहारी जाऊ नये असं त्याला वाटतं. सैफ आपल्या तरूणपणाच्या आठवणी शेअर करतो. तो म्हणतो, लहान असताना मीही खोडकर होतो. सतत खोड्या करत असे. पण समज यायला लागल्यावर आयुष्यात संतुलन राखणं गरजेचं असल्याचं जाणवू लागलं. आता तर मी खूपच समजूतदार झालो आहे! करिना आणि सैफ तैमूरला कॅमेर्‍यापासून लांब ठेवण्याचा बराच प्रयत्न करतात. पण कितीही प्रयत्न केले तरी या बाबी पूर्णपणे रोखता येत नाहीत. तैमूर सार्वजनिक जीवनात वावरणार आणि त्यालाही अशा गोष्टींमध्ये संतुलन राखणं शिकावं लागणार आहे, असं सैफ म्हणतो.
 
वैशाली जाधव 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘हाऊसफुल ४ला #MeToo चा फटका