Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘विश्वरुपम २’ सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण

, शनिवार, 2 डिसेंबर 2017 (10:50 IST)

कमल हसन यांच्या ‘विश्वरुपम २’ सिनेमाचे चित्रीकरणाच्या  शेवटच्या दिवशी कमल हसन यांनी संपूर्ण टीमसोबत सेटवर एक फोटो काढला. हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअरही केला. सिनेमाचे शेवटचे चित्रीकरण चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत (ओटीए) पार पडले. आपल्या ट्विटमध्ये ओटीएचे कौतुक करताना त्यांनी लिहिले की, ”विश्वरुपम २’ आणि हिंदी ‘विश्वरुपम २’चे चित्रीकरण करत आहोत. शेवटचे काही दिवस आहेत. भारताला आणि मला नेहमीच ओटीए चेन्नईचा अभिमान आहे. ही एकमेव अकादमी आहे जिथे महिलांना प्रशिक्षण दिले जाते. मी या महिलांचा सन्मान करतो आणि खासकरुन एका महिलेचा जास्त जी भारत माता आहे.’

कमल हसन यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘विश्वरुपम २’ चे हिंदीमध्येही चित्रीकरण होत आहे. ‘विश्वरुपम’ सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा हा सिनेमा वादांत अडकला होता. पण तरीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते. घिबरन या संगीतकाराने ‘विश्वरुपम’ सिनेमाला संगीत दिले होते. ‘विश्वरुपम २’ साठीही संगीतकार म्हणून त्याचीच निवड करण्यात आली आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिंदीतील सैराट अर्थात धडक चे शुटींग सुरु फोटो व्हायरल