Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात २,९९२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात २,९९२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद
, गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (07:43 IST)
राज्यात बुधवारी २,९९२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०,३३,२६६ झाली आहे. राज्यात ३७,५१६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५१,१६९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. यामध्ये मुंबई ७, नवी मुंबई २, पुणे ६, सातारा २, वाशिम २, नागपूर ४ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३० मृत्यूंपैकी १८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७ मृत्यू पुणे ४, अमरावती १, ठाणे १ आणि वाशिम १ असे आहेत.
 
बुधवारी ७,०३० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,४३,३३५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५८ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,४७,६४,७४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,३३,२६६ (१३.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,८२,१८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपकडून द्विस्तरीय शिवगान स्पर्धेचे आयोजन