UPSC Vacancy: संघ लोक सेवा आयोग UPSC ने अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांवर लिखित परीक्षा न देता निवड होईल. याबद्दल संपूर्ण माहितीसाठी UPSC च्या अधिकृत वेबसाइट वर विजिट करावे. UPSC कडून एकूण 296 पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांची माहिती आपल्याला upsc.gov.in वर मिळेल.
या पदांसाठी भरती
डाटा प्रोसेसिंग असिस्टेंट- 116
असिस्टेंट पब्लिक प्रॉसेक्यूटर- 80
जूनियर टेक्निकल ऑफिसर- 6
स्पेशलिस्ट ग्रेड 3 असिस्टेंट प्रोफेसर-45
लेक्चरर- 1
असिस्टेंट डायरेक्टर- 1
या पदांवर अर्ज करण्यासाठी वेगवेगळी शैक्षणिक योग्यतेची गरज आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कंप्यूटर साइंस, कंप्यूटर एप्लिकेशन, आयटीमध्ये पीजी डिग्री, बीई, बीटेक, एमबीबीएस, एललबी, एलएलम अशा प्रकारे शिक्षण स्तर असावे लागणार.
या पदांसाठी अर्ज करण्याचे वय 30 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असावे. यूपीएससी कडून जाहीर अर्जसाठी आपण 11 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करु शकता. आवेदन शुल्क 25 रुपए ठेवण्यात आले आहे.
यूपीएससी कडून या पदांवर निवड साक्षात्कार द्वारे केली जाईल. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार साक्षात्कारासाठी बोलावले जातील. यूपीएससी कडून सांगण्यात आले आहे की उमेदवारांची संख्या अधिक असल्यास परीक्षा घेतली जाईल.