Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महा मेट्रो मध्ये 139 पदांवर भरती, अर्जाची मुदत वाढली

महा मेट्रो मध्ये 139 पदांवर भरती, अर्जाची मुदत वाढली
, मंगळवार, 26 जानेवारी 2021 (15:59 IST)
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MAHA-Metro) मध्ये 139 पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते, ज्यापैकी 86 पदांवर सुपरवाइजरी आणि 53 पदांवर नॉन सुपरवाइजरी पदांसाठी भरती होणार होती. या पदांसाठी उमेदवार अर्ज करु शकले नसतील तर त्यांना एक अजून संधी मिळत आहे. या पदांवर अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता 31 जानेवारी पर्यंत या पदांसाठी अर्ज करता येऊ शकतं. पूर्वी या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी होती. आता 31 जानेवारी पर्यंत अर्ज करता येईल.
 
महा मेट्रो मध्ये भरतीसाठी माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवार mahametro.org वर लॉग इन करुन भरतीची विस्तृत माहिती मिळवू शकतात. निवडलेल्या उमेदवारांना पुढील दोन वर्षासाठी प्रोबेशन पीरियडवर ठेवण्यात येईल. उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्टच्या आधारावर होईल. ही ऑनलाइन टेस्ट पुणे, मुंबई, नागपुर, औरंगाबाद येथे आयोजित होतील.
 
महाराष्ट्र मेट्रो मध्ये भरतीसाठी उमेदवारांकडे इंजीनियरिंग, डिप्लोमा, आयटीआई असणे अनिवार्य आहे. सुपवाइजरी पदांसाठी किमान वय 18 इतके आहे जेव्हाकि कमान वय 28 वर्ष इतके आहे. तसेच नॉन सुपरवाइजरी पदांसाठी किमान वय 18 वर्ष तर कमान वय 25 वर्ष इतके आहे. आरक्षणाच्या आधारे वेगवेगळ्या श्रेणीतील लोकांना वयाची सवलत देण्यात येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काजळ पसरत असेल तर या टिप्स अमलात आणा