Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 17 March 2025
webdunia

ECGC Recruitment 2021 : सरकारी नोकरीची संधी

ECGC Recruitment 2021 : सरकारी नोकरीची संधी
, गुरूवार, 21 जानेवारी 2021 (08:59 IST)
वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या एक्स्पोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनमध्ये पदवीधर भरतीसाठी अप्लाय करु शकतील. ही कंपनी भारतीय निर्यातदारांना निर्यात विमा सहकार्य उपलब्ध करवते. इसीजीसी मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 
 
पद- प्रोबेशनरी ऑफिसर
एकूण पदं- ५९
वयोमर्यादा- २१ ते ३० वर्षं, इमाव- ३३ वर्षं, अजा/अज- ३५ वर्षं, दिव्यांग- ४० वर्षं
शैक्षणिक पात्रता- पदवीधर
निवड पद्धती- १४ मार्च, २०२१ रोजी ऑनलाइन पद्धतीनं परीक्षा होणार
ऑनलाइन रजिस्ट्रेशन- १ ते ३१ जानेवारी, २०२१
वेबसाइट- www.ecgc.in
 
ऑनलाइन पद्धतीनं परीक्षा १४ मार्च, २०२१ रोजी होणार असून यात निगेटीव्ह मार्किंग पद्धत लागू असेल. चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नास असलेल्या अंकापैकी १/४ गुण वजा केले जातील. परीक्षेत ५ घटक आहे. २०० प्रश्नांसाठी २०० गुण असतील. यासाठी १४० मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. डिस्क्रीप्टीव्ह परीक्षेसाठी निबंध लेखन तसेच सारांश लेखन हे दोन घटक आहे. प्रत्येक घटकासाठी २० गुण आहे आणि यासाठी ४० मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मध : दररोज योग्य प्रमाणात वापरा, आरोग्य आणि तारुण्य टिकवा