रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न बघणार्यांसाठी सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये भरती निघाली आहे. योग्य व इच्छुक उमेदवार 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करु शकतील. 26 पदांसाठी भरती केली जाणार आहे.
या भरतीसाठी 18 ते 25 वर्षे अशी वयाची अट ठेवण्यात आली आहे. गैर तांत्रिक पदांसाठी 12 वी पास तर इतर काही पदांसाठी 10 वी पास उमदेवार देखील अर्ज करु शकतात.
सामान्य वर्गासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क आकारले जाईल तर एससी, एसटी उमेदवार आणि महिलांसाठी 250 रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. शुल्क ऑनलाइन भरता येणार आहे.