Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात ४ हजार ९१३ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात ४ हजार ९१३ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज
, गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (13:48 IST)
महाराष्ट्रात बुधवारी ४ हजार ९१३ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण १८ लाख २४ हजार ९३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९४.६२ टक्के इतका झाला आहे. राज्यात ३ हजार ५३७ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ७० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.५६ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २६ लाख, ७२ हजार २५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख २८ हजार ६०३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८० हजार व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार १२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्या ५३ हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
 
राज्यात ३ हजार ५३७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ही १९ लाख २८ हजार ६०३ इतकी झाली आहे. नोंद झालेल्या ७० मृत्यूंपैकी ३७ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १९ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एमपीएससीची परीक्षा देत आहात, मग वाचा 'ही' महत्वाची बातमी