Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 11 April 2025
webdunia

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षाना कोरोनाची लागण

Corona
, बुधवार, 8 जुलै 2020 (08:17 IST)
जगातील कोरोनाग्रस्तांचा यादीत ब्राझील देश दुसऱ्या स्थानावर आहे. आता ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती एएफपी या न्यूज एजेंसीने दिली आहे. ब्राझील राष्ट्रध्यक्षांनी स्वतः याबाबत मंगळवारी सांगितले. त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र ते पूर्णपणे ठीक असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ब्राझीलमध्ये १६ लाख ४३ हजार ५३९ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून यापैकी ६६ हजार ९३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १० लाख ७२ हजार २२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सध्या ५ लाख ५ हजार २१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये दिवसेंदिवस नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत आहे.
 
अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३० लाख ५७ हजार ११वर पोहोचला आहे. यापैकी १ लाख ३३ हजार ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १३ लाख २६ हजार ७७० रुग्ण अमेरिकेत कोरोनामुक्त झाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनावर लस येण्यासाठी अजून ६ महिने लागणार