Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Coronavirus: कोरोना व्हायरसपासून बचावासाठी घरगुती उपाय

Coronavirus: कोरोना व्हायरसपासून बचावासाठी घरगुती उपाय
, मंगळवार, 7 जुलै 2020 (16:04 IST)
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान मांडले आहे आणि चिंतेची बाब म्हणजे यावर अजून लस किंवा औषध आलेले नाही. त्यामुळे लोकांमध्ये दहशत आहे आणि बचावासाठी लोक उपाय शोधत आहे. अशात आपण देखील घरात थोडीफार काळजी घेऊन यापासून बचाव करू शकतो.
 
योगा
दररोज अनुलोम- विलोम, सूर्य नमस्कार, प्राणायाम आणि कपालभाती करावं. याने इम्युन सिस्टम मजबूत होतं.
 
गोमूत्र
गोमूत्राचं अर्क उत्तम उपाय आहे.
 
काढा
गिलोय, हळद, काळी मिरी, तुळशीचे पान पाण्यात उकळून काढा तयार करावा आणि अधून-मधून घेत राहावा.
 
तुळस
दिवसभरात दोन ते तीन तुळशीचे पान चावून खावे किंवा आपण तुळशीचा चहा देखील सेवन करू शकता.
 
एलोवेरा ज्यूस
याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.
 
गरम पेय पदार्थ
गरम चहा, गरम पाणी पित घोट-घोट पित राहणे फायद्याचे ठरेल.
 
ओवा
चिमूटभर ओव्यात चिमूटभर सेंधा मीठ घालून चघळावे.
 
लवंग‍
दिवसातून एक लवंग खाणे देखील फायदेशीर ठरेल.
 
हळद
रात्री झोपताना गरम पाण्यात चिमूटभर हळद मिसळून पिणे फायद्याचं ठरेल. या व्यतिरक्ति आपण कोमट पाण्यात हळद आणि सेंधा मीठ मिसळून गुळण्या देखील करू शकतात.
 
हे सर्व उपाय आपलं इम्यून सिस्टम मजबूत व्हावं यासाठी सांगण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयुर्वेद प्रमाणे वसंत ऋतूत काय खावे आणि काय खाऊ नये ते जाणून घ्या