Publish Date: Fri, 07 Feb 2020 (16:14 IST)
Updated Date: Fri, 07 Feb 2020 (16:15 IST)
साहित्य
अर्धा टोमॅटो
एक चमचा चंदन पावडर
चिमूटभर हळद
वापरण्याची पद्धत
टोमॅटो मधील बियाणे काढावी.
बियाणे नसलेल्या टोमॅटोत चंदनाची पावडर आणि हळद मिसळून त्याची पेस्ट करावी.
ही पेस्ट चेहर्यावर लावून पंधरा मिनिटे तशीच राहू द्यावी. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा.
आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा हा उपाय करता येऊ शकतो.
हे कसे कार्य करते?
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते, त्यामुळे चेहरा सतेज होतो.