Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखेर यश मिळाले, कोरोनावर प्रभावी ठरणारे औषध सापडले

अखेर यश मिळाले, कोरोनावर प्रभावी ठरणारे औषध सापडले
, बुधवार, 17 जून 2020 (07:51 IST)
कोरोना व्हायरसवर अखेर प्रभावी ठरणारे एक औषध शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. या औषधाचा वापर करुन करोनामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवता येणे शक्य आहे. डेक्सामेथासोन असे या औषधाचे नाव आहे. हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे.
 
या औषधामुळे मृत्यू दर कमी होत असल्याचे समोर आले आहे. डेक्सामेथासोनचा कमी प्रमाणात डोस देऊन गंभीर अवस्था असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवता येतात. संशोधकांनी अभ्यासातून हा निष्कर्ष मांडला आहे. 
 
यूकेमधील क्लिनिकल ट्रायलमध्ये हे औषध रुग्णांवर प्रभावी ठरलं आहे. या औषधाच्या चाचणीतून समोर आलेले निष्कर्ष म्हणजे महत्वाचा शोध आहे, असे या अभ्यासात सहभागी असलेल्या वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. करोनामुळे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांवर तात्काळ या औषधाचा वापर सुरु करावा असं वैज्ञानिकांच मत आहे.
 
“करोनामुळे व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना डेक्सामेथासोनचा डोस दिल्यानंतर ते रुग्ण बरे होत असल्याचे दिसले आहे. महत्वाचं म्हणजे हे औषधही कमी खर्चिक आहे” असे मार्टिन लँडरे म्हणाले. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक असलेले मार्टिन या संशोधनात सहभागी होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्योतिरादित्य शिंदे यांची कोरोनावर यशस्वी मात