Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन : कोरोना लशीची भीती दूर करण्यासाठी पहिला डोस मीच घेईन

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन : कोरोना लशीची भीती दूर करण्यासाठी पहिला डोस मीच घेईन
, सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (14:19 IST)
कोरोना विषाणूवरील लस जानेवारी 2021 पर्यंत तयार होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. तसंच, या लशीबद्दल लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पहिला डोस मीच घेईन, असंही डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
 
"कोरोनावरील लस पहिल्यांदा त्या लोकांसाठी उपलब्ध करून दिली जाईल ज्यांना तिची सर्वाधिक गरज आहे. मग भलेही यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसले तरी चालेल."
 
सरकार ज्येष्ठ नागरिक आणि उच्च जोखमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना कोविड-19 च्या लशीसाठी आपत्कालीन प्राधिकरण स्थापण्याचाही विचार करत असल्याची माहितीही डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Reliance Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये 1 GB डेटा फक्त 3.5 रुपयांमध्ये