Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इक्रम अलिखिलने तेंडुलकरला मागे टाकले

इक्रम अलिखिलने तेंडुलकरला मागे टाकले
लीडस्‌, , शनिवार, 6 जुलै 2019 (13:43 IST)
अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज इक्रम अलिखिल याने आसीसीच्या बाराव्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिनतेंडुलकर याला मागे टाकले.
 
18 वर्षाच्या इक्रमने (टीनएजर) गुरुवारी वेस्ट इंडीजविरुध्दच्या साखळी क्रिकेट सामन्यात 92 चेंडूत 86 धावा काढल्या. सर्वात लहान वयात सर्वाधिक धावा काढणारा तो फलंदाज ठरला. सचिनसारख्या प्रख्यात फलंदाजाचा विक्रम मोडल्याचा मला अभिभान वाटतो आणि मी समाधानी आहे, असे तो म्हणाला. मी सचिन नव्हे तर श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगारकाराला माझा आदर्श मानतो. अशी फलंदाजी करताना कुमार माझ्या मनात असतो आणि त्याप्रमाणे खेळण्याचा माझा विचार असतो, अशी भर त्याने घातली.
 
सतत स्ट्राइक बदलणची संगारकाराची क्षमता आहे. त्याप्रमाणे मी खेळतो. त्यामुळे मी जागतिक दर्जाचा फलंदाज झालो. माझ्या संघासाठी जेवढे शक्य तेवढे प्रयत्न मी करतो, असे तो म्हणाला; परंतु हा तरुण दुर्दैवी ठरला. अफगाण संघ वेस्ट इंडीजकडून 23 धावांनी पराभूत झाला.
 
वेस्ट इंडीजने 50 षटकात 6 बाद 311 धावा केल. 312 धावांचा पाठलाग करताना मी सर्वाधिक 86 धावा अफगाणकडून काढल्या, असेही त्याने सांगितले. गतवर्षी 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इक्रममुळे अफगाणिस्तानने उपान्त्य फेरी गाठली होती.
 
नऊ सामन्यात अफगाणकडून माझ्या सर्वाधिक धावा ठरल्या, परंतु पहिले विश्वचषक शतक मात्र पूर्ण करता आले नाही, याबद्दल खंत वाटते. 
 
इक्रम हा सुरूवातीस अफगाणच्या 15 जणांच्या विश्वचषक संघाचा सदस्य नव्हता. मोहमम्द शहजादला गुडघा दुखापत झाली. त्याच्याऐवजी इक्रमचा संघात समावेश करण्यात आला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रोहित शर्माला 'हे' तीन विश्वविक्रम मोडण्याची संधी