Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्रॅक बदलण्याच्या प्रयत्नात गिरीश परदेशी

- श्री. राम कोंडीलकर

ट्रॅक बदलण्याच्या प्रयत्नात गिरीश परदेशी
PR
एखादी व्यक्तिरेखा यशस्वी झाली, की ती साकारणार्‍या कलावंताची तीच ओळख बनून जाते. त्या कलावंताच्या कारकिर्दीतील खरं तर तो एक टप्पा असतो, दुर्दैवाने त्याचं सर्व कर्तृत्व त्या व्यक्तिरेखेमुळे झाकोळून जातं. सच्चा कलावंत अशा व्यक्तिरेखेत कधीच गुंतून पडत नाही. त्याचा कलाप्रवास निरंतर सुरू राहतो. 'या सुखांनो या'मधील सर्वात लोकप्रिय ठरलेला गिरीश परदेशी त्याच्या 'मयुरेश'च्या भूमिकेतून बाहेर पडून नवीन भूमिकांची आव्हानं स्वीकारायला सज्ज झालाय. त्याचा पहिला वहिला बहुचर्चीत फॉरेनची पाटलीण हा चित्रपट ९ मे रोजी कोल्हापूरमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने गिरिश परदेशींसोबतचा हा संवाद

''मयुरेशने मला अमाप प्रसिद्धी दिली, लोकांचं प्रेम मिळवून दिलं. 'या सुखांनो या'मधला मयुरेश लोकांना आपल्याच घरातील एक वाटायचा. मी रस्त्यावरून जाताना लोक मला 'मयू' म्हणून हाक मारायचे यातच त्या भूमिकेचे यश होतं. मात्र 'या सुखांनो या'च्या आधी गेली आठ वर्षं मी या इंडस्ट्रीत काम करतोय,'' गिरीश परदेशी आपल्या कारकिर्दीविषयी, त्याच्या कलाविषयक जाणिवांविषयी माध्यमातील सध्याच्या ट्रेण्डबद्दल मोकळेपणाने गप्पा मारत होता.

'मी पुण्यात बी.कॉम वेलं. त्याचवेळी मी मॉडेलिंग आणि ऍडस्‌मध्ये काम करायचो. १९९५ साली मी एन्‌एसडीत प्रवेश घेतला आणि चार वर्षांनी मुंबईत अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आलो. माझ्या घरच्यांच्या पाठिंब्यामुळे मी मुंबईत स्थिरावू शकलो. स्ट्रगल करावा लागलाच, पण त्यामुळे नैराश्य वगैरे आलं नाही. सुरुवातीच्या काळातच मी राज बब्बर यांच्या 'बुलबुल बाग', आशा पारेख यांच्या 'कोरा कागज', बासू चटर्जीच्या 'हुआ सवेरा' या मालिकांमध्ये कामं केली आहेत. बासूदांबरोबर 'प्रतीक्षा' या टेलिफिल्ममध्येसुद्धा मी कामं केली आहेत. कविता चौधरी यांनी त्यांच्या 'युवट औनर' मध्येही मला भूमिका दिली होती.

एनएसडी 'तून' प्रशिक्षण घेऊन तू मालिकांमध्ये काम करतो आहेत, त्यातून कलात्मक समाधान मिळतंय का?
'क्रिएटिव्ह सॅटिसफॅक्शन हे प्रत्येक कलावंताला हवंच असतं. मी त्यासाठी प्रायोगिक नाटकांतून काम करायचो. राजश्री शिर्केच्या शाम सखी यांसारख्या नृत्यनाट्यांतूनही मी कामं करायचो. आणि सर्वच मालिका काही कमअस्सल नसतात. 'बा, बहू और बेबी' यात आतिश कपाडियांच्या मालिकेल भूमिकेने मला खूप आनंद दिला आहे. हीच भूमिका पाहून मला राहुल प्रॉडक्शनने 'मयुरेश'ची भूमिका ऑफर केली.

मुंबईत रहायचं म्हणजे आपलं स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हिंगही मेंटेन करावं लागतं. हा तोल सांभाळण्यासाठी मला कधी कधी तडजोडी कराव्या लागतात आणि सध्या कलात्मक आणि व्यावसायिक असा भेद फारसा राहिलेलाच नाही, त्यामुळेच प्रत्येक कलावंताने आपण कोणती भूमिका करतो आहोत आणि त्यात आपली इन्व्हॉलमेंट किती असावी याचं भान ठेवलं पाहिजे. दूरदर्शनचा प्रभाव जबरदस्त आहे हे देखील आपण मान्य करायला हवं. प्रेक्षकांना कोणत्या प्रकारचं मनोरंजन द्यायचं हे मालिका दिग्दर्शकांनी ठरवायला हवं. 'प्रेक्षकांना आवडतं म्हणून आम्ही अशा प्रकारच्या मालिका तयार करतो आणि दूरदर्शनवर याच प्रकारच्या मालिका दाखवल्या जातात म्हणून आम्ही त्या बघतो' असं हे चक्र आहे. मला वाटतं जर प्रेक्षकांना चांगल्या दर्जाचे कार्यक्रम दिले तर प्रेक्षक त्याला प्रतिसाद देतातच. विजया मेहता यांची 'लाईफ लाईन', श्याम बेनेगल यांची बनवलेली 'भारत एक खोज' यांसारख्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहेतच ना! मी स्वतः सिनेमावर अधिक लक्ष वेंत्र्द्रीत करतोय.'

webdunia
PR
तुला चित्रपटात कोणत्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतील?
सैफ अली खान आणि इरफान खान हे माझ्यासाठी आदर्श आहेत. या दोघांनी केलेल्या भूमिकांमध्ये केवढी रेंज आहे! सैफ ने 'परिणिता', 'सलाम नमस्ते' आणि 'ओंकारा'मधील भूमिकांमध्ये केवढी विविधता दाखवलीय. इरफानची 'मेट्रो'मधील भूमिकाही मला प्रचंड आवडलीय. सध्या मला वेगवेगळे रोल ऑफर झालेत. 'फॉरेनची पाटलीण'मध्ये परदेशातून येताना तिथल्या मुलीशी लग्न करून आलेला पाटलांचा मुलगा, 'आयुष्याला भेटू या'मध्ये आर्क्टिटेक्ट असणारा आणि महत्त्वाकांक्षेपोटी आपल्या वैयक्तिक प्रायोरिटीजकडे दुर्लक्ष करणारा तरूण मी साकारतोय. या चित्रपटात माझ्याबरोबर मोहन आगाशे, प्रशांत दामले आहेत. मला सर्वाधिक अपेक्षा आहेत त्या 'मर्मबंध' या चित्रपटातील भूमिकेबद्दल.

पारतंत्र्यातील गोव्यामध्ये हौशी रंगभूमीवर स्त्रीपार्टी भूमिका करणार्‍या कलावंताचा हा रोल खूपच आव्हानात्मक आहे. या कलावंताच्या ३० वर्षांपासून ते ५५ वर्षांपर्यंतचा पंचवीस वर्षांच्या काळाचा आलेख मला या भूमिकेतून दाखवायचा होता. ही भूमिका करताना मला माझे एनएसडीतले शिक्षक फिदा हुसेन डोळ्यांसमोर होते. वयाच्या नव्वदीत देखील त्यांच्या रंगमंचावरील सळसळता उत्साह तरुणांना लाजवणारा होता. डॉ. श्रीराम लागू किंवा 'जांभूळ आख्यान'मधील विठ्ठल उमप यांच्यातील ऊर्जा माझ्यासाठी आदर्श आहे.

'फॉरेनची पाटलीण' कोल्हापूरात
मराठी चित्रपटात 'फॉरेनची' नायिका

Share this Story:

Follow Webdunia marathi