उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन सर्वांना कंटाळा येतो. तसेच अनेक वेळेस उपास असतांना काय बनावे हे देखील समजत नाही. म्हणून आज आपण पाहणार आहोत चविष्ट राजगिरा पराठे, जे तुम्ही उपास असतांना देखील बनवू शकतात उपास नसतांना देखील संध्याकाळच्या नाष्टासाठी बनवू शकतात. राजगिरा मसाला पराठे चवीला जेवढे चविष्ट लागतात तेवढेच ते बनवायला देखील सोपी आहे.
साहित्य-
एक कप राजगिरा पीठ
100 ग्रॅम पनीर
दोन उकडलेले बटाटे
अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर
किसलेले आले
दोन बारीक चिरलेल्या मिरच्या
सेंधव मीठ
एक चमचा जिरे पूड
एक चमचा तिखट
1/4 कप दाण्याचा कूट
2 चमचे शुद्ध तूप
कृती-
एका मोठ्या बाऊलमध्ये राजगिरा आता घ्यावा. त्यामध्ये वरील सर्व मसाले मिक्स करावे. तसेच आवश्यक असल्यास पाणी घालावे. व हा गोळा चांगल्या प्रकारे मळून घ्यावा. आता छोटे छोटे एकसारखे आकाराचे गोळे तयार करावे. लाटून घ्यावे. हा पराठा तूप लावून चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा. तर चला तयार आहे आपला राजगिरा मसाला पराठा जो तुम्ही चटणी किंवा रायता सोबत खाऊ शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik