Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गणपतीची मूर्ती कशी असावी

गणपतीची मूर्ती कशी असावी
, सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (11:04 IST)
१) गणपती १ फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी,
 
२) मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे,
 
३) सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम.
 
४) साप, गरूड, मासा, किंवा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये. 
 
५) शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिव पार्वतीची पूजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे. 
 
६) गणेश मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये. 
 
७) गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्ती मध्ये देवत्व येत नाही, तोवर ती केवळ माती समजावी.विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. 
 
८) मूर्तीची प्राणप्रतिष्ठापण करण्याअगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मूर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे, व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणू नये.
 
९) कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांच्याकडून पूजा करून नैवेद्य दाखवून घ्यावा, गणपती विसर्जनाची घाई करू नये. 
 
१०) गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये.  
 
११) गणपती ला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे,
 
१2 ) विसर्जन मिरवणूक काढताना टाळ मृदंग अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्या, अश्लील नृत्य व गाणी वाजवून विकृत चाळे करू नका !

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भगवंताची लीला