Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

योग्य संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी व्रत

योग्य संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी व्रत
, शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (10:08 IST)
पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला पुत्रदा एकादशी व्रत केलं जातं. हे व्रत केल्याने योग्य संतानाची प्राप्ती होते. संतानाच्या प्रगतीसाठी देखील हे व्रत केलं जातं.
 
पौष पुत्रदा एकादशी व्रत विधी आणि नियम
एकादशी व्रत करु ‍इच्छित असणार्‍यांनी दशमी तिथीला सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करु नये.
दशमी तिथीला देखील सात्विक भोजन ग्रहण करावे आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे.
एकादशीला पहाटे लवकर उठून स्नानादि केल्यावर व्रत संकल्प घ्यावा.
नंतर स्वच्छ स्थानावर भगवान विष्णूची प्रतिमा स्थापित करावी.
नंतर शंखामध्ये गंगा जल घेऊन प्रतिमेवर अभिषेक करावे.
भगवान विष्णूंना चंदनाचा टिळा लावावा.
तांदूळ, फुलं, अबीर, गुलाल, तुळस, तीळ अर्पित करावे. 
पंचामृताने विष्णूंची पूजा करावी. 
देवाला पिवळे वस्त्र अर्पित करावे.
हंगामी फळं जसे आवळा, लिंबू आणि एक सुपारी अर्पित करावी.
नंतर गाईच्या दुधाने बनवलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. 
हे व्रत निर्जला अर्थात पाणी न पिता करावे. विशेष परिस्थितीत शक्य नसल्यास संध्याकाळी दीपदान करून फलाहार करावा.
एकादशी व्रताचे पारणं द्वादशी तिथीला करावे.
द्वादशीला पहाटे लवकर उठून स्नान करुन पूजा करुन भोजन तयार करावे. 
नंतर गरजू किंवा ब्राह्मणाला सन्मानपूर्वक भोजन द्यावे. दान-दक्षिणा द्यावी.
हे व्रत आणि पूजा विधी केल्याने योग्य संतानाची प्राप्ती होते.
 
व्रत कथा 
भद्रावती पुरीमध्ये राजा सुकेतूमान राज्य करत होते. त्यांच्या राणीचे नाव चंपा होतं. तिला संतान नव्हती म्हणून दोघे पती-पत्नी सदैव काळजीत असायचे. या काळजीत असेच एके दिवशी राजा सुकेतूमान जंगलात निघून गेले. तिथे मुनी वेद पाठ करत होते. राजांनी त्या सर्व मुनींची वंदना केली तेव्हा मुनींनी राजाचे दु:ख जाणून त्यांना पुत्रदा एकादशी व्रत करण्यासाठी सांगितले. हे ऐकून राजाने पुत्रदा एकादशी व्रत केले. या व्रताच्या फलस्वरुप राणीने तेजस्वी पुत्राला जन्म दिला आणि ज्याने पुढे न्यायपूर्वक शासन केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Haridwar Kumbh 2021: किन्नर आखाडा पहिल्यांदाच जुना आखाड्यासोबत निघणार आहे किन्नर आखाड्याची पेशवाई