Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

स्वामी समर्थ प्रकट दिन शुभेच्छा

Swami Samarth Prakat Din 2025 Wishes
, सोमवार, 31 मार्च 2025 (08:08 IST)
निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी,
नित्य आहे रे मना । अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
उधळा गुलाल, वाजवारे नगाडे
त्रैलोक्यचे स्वामी आज धर्तीवर आले
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा
 
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे..
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा
 
निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ।
ह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा
ALSO READ: Swami Samarth Prakat Din 2025 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन कधी, काय करावे?
अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद
अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी
श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा
 
उगाची भितोसी भय हे पळू दे, 
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, 
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, 
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा 
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा
 
जय जय सद्गुरू स्वामी समर्था
आरती करू गुरुवर्या रे
अगाध महिमा तव चरणाचा
वर्णाया मती दे वा रे
श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा
विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, 
तिथून साथ देतो मी, 
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा
 
भक्त वत्सल खरा तू एक होसी,
म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,
किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले,
तुझ्या सूता नलगे चरणावेगळे
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

अजाण हतबल भ्रमीत मनिची तळमळ कशी साहू।
निरसूनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ईद-उल-फितर वर निबंध Essay on Eid-ul-Fitr